३ पथकासह रामटेक परिसरात ७ टिप्पर पकडले
प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक :- अवैध वाळू वाहतुकी विरोधात पोलीस प्रशासनाने धडक मोहिम हाती घेतली असून पोलीस प्रशासनाच्या पथकास तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुमसर-रामटेक-मनसर महामार्गावर एकाच वेळी केलेल्या कारवाईत वाळूचे ७ टिप्पर पकडले. विविध वाहनांवर कारवाई करुन ७७ ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आली असून एकूण ३ कोटी ४८ लक्ष ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला...
उपविभागिय पोलीस अधिकारी रमेश बरकते त्यांच्या पथकासह तुमसर ते रामटेक राखी तलावाजवळ नाकाबंदी केली असता एमएच ३६ एबी ०९४४ मध्ये १२ ब्रास वाळू तर एमएच ४० सिटी ९२६८ मध्ये १५ ब्रास वाळू भरलेले २ टिप्पर पकडले. याच मार्गावरील नगरधन फाटा रामटेक स्थानिक गुन्हे शाखा पथकांनी एमएच १२ सिटी ८४६२ मध्ये १० ब्रास, एमएच ४९ बीझेड ७२४९ मध्ये १० ब्रास वाळू, एमएच ४० सीवाय १८१९ मध्ये १० ब्रास वाळू तर एमएच ४० सिटी १८१९ मध्ये १० ब्रास वाळू भरलेले ४ टिप्पर पकडले. दुसरीकडे रामटेक पोलिसाच्या पथकाने राखी तलाव जवळ नाकाबंदी करत एमएच ४० सिटी ९६३५ मध्ये १० ब्रास वाळू भरलेला एक टिप्पर पकडला. हे सातही टिप्पर भंडारा जिल्ह्यातून ओव्हरलोड वाळू घेऊन रामटेक मनसर मार्ग नागपूर दिशेने जात होते. सदर कारवाई ७७ ब्रास वाळू सह ७ वाहने असा ३ कोटी ४८ लक्ष ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे वाळू अवैधरित्या विनापरवाना असल्याचे कागदपत्राच्या तपासणीत स्पष्ट झाले. सदर वाळू पाटील टोला घाट ता. तिरोडा जि. गोंदिया व गोंदिया जिल्ह्यातील लोबी घाट येथून आणल्याचे वाहन चालकाने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी वाळूसह टिप्पर जप्त करीत टिप्पर चालक व मालकांविरुद्ध पोस्टे रामटेक येथे कलम ३०३(२), ४९ भा.न्या. सं सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहकलम ४, २१ खाण खनिज अधिनियम, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम, सह कलम मोवाका अन्वये ७ गुन्हे दाखल करून पुढील तपास करीत आहे.
टिप्पर चालकांवर गुन्हे दाखल
एसडीओच्या पथकाने टिप्पर चालक किशोर नीळकंठ सूर्यवंशी, रा. शिवणी (भोंडकी), ता. रामटेक, मालक आशिष पटले, रा. डोंगरला, ता. तुमसर, जिल्हा भंडारा, चालक ईश्वर पुंडलिक गोटेफोडे, रा. बोरी, ता. तुमसर, जिल्हा भंडारा, मालक नेहाल खोब्रागडे, रा. तुमसर, जिल्हा भंडारा, एलसीबीच्या पथकाने चालक लखन सुखराम पारधी, रा. शिहरीता. मोहाडी, जिल्हा भंडारा, चंद्रकुमार आनंदराव पुंडे, रा. नवेगाव, ता. मोहाडी, जिल्हा भंडारा, कैलास गजानन ढोरे, रा. सराखा (बोर्डा), ता. रामटेक, आकाश नारायण राऊत, रा. हरदोली, ता. तुमसर, जिल्हा भंडारा, तसेच रामटेक पोलिसांनी चालक राकेश रमाकांत मेश्राम, रा. सालई (खुर्द), ता. मोहाडी, जिल्हा भंडारा व मालक मनोज नागोराव शेंडे, रा. परसवाडा, ता. तुमसर, जिल्हा भंडारा यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून आरोपी केले आहे...
