केळवणे प्रतिनिधी: केळवणे येथील गायक, दिग्दर्शक तेजस पाटील यांच्या पुढाकाराने ,नवी मुंबई जुहू गाव येथे काही दिवसांपूर्वी काही नराधमांनी आणि समाजकंटकांनी आपल्या आगरीकोळीकराडी संस्कृती चे प्रतिक असणाऱ्या नाखवा नाखविन च्या पुतळ्यांची विटंबना केली,
या घटनेचा पोलीस प्रशासन व भुमीपुत्र सतिश पाटील यांनी योग्य सुगावा लाऊन आरोपींना पकडले या बद्दल आज कलाकारांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आहे व आपल्या संस्कृती ची ओळख असणाऱ्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करूण मानवंदना देण्यात आली,
यावेळी तेजस पाटील, दिगंबर कोळी, वैशाली म्हात्रे,रंजिता पाटील,चिंतामण शिवडीकर, संजय भोईर, संध्या वैती,साईनाथ पाटील हे भुमीपुत्र कलाकार उपस्थित होते, पुतळ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी सीसीटीव्ही कँमेरा बसविण्याची मागणी तेजस पाटील यांनी केली,
