कोलाड (श्याम लोखंडे): रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे उमेदवारच ठरले किंगमेकर मारली बहुमताने बाजी. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून रोहा तालुक्यातील आंबेवाडी गटातून जिल्हा परिषद उमेदवार सौ निधी नरेंद्र जाधव यांनी सौ सीमा समीर महाबळे यांचा पराभव करून सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या आहेत... तर कोलाड पंचायत समिती गणात जगन्नाथ धनावडे यांनी सौ शोभा सरफळे यांचा पराभव करून विजय संपादित केला. तसेच आंबेवाडी पंचायत समिती गणात संजय मांडुळस्कर यांनी सुरेश दादा महाबळे यांचा पराभव करत राष्ट्रवादीच्या विजयाची परंपरा कायम राखली असल्याचे पुन्हा एकदा आंबेवाडी जिल्हा परिषद गट आणि गणात परंपरा राखत स्पष्ट करून दाखवले...
गेली अनेक दिवस चर्चेचा विषय बनलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले होते त्याचा निकाल आज सोमवारी 9 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला त्यात आंबेवाडी उमेदरानी पुन्हा हम कुच्छ कम नहीं हे शिवसेना शिंदे गटाला इंगा दाखवत विजयाचे शिल्पकार राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे उमेदवार ठरले आहेत...
सौ निधी नरेंद्र जाधव यांनी 12897 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सीमा महाबळे यांना 8390 मते मिळाली असून या लढतीत निधी नरेंद्र जाधव यांनी 4507 मतांची आघाडी घेत तसेच कोलाड पंचायत समिती गणात जगन्नाथ धनावडे यांनी 6083 यांच्या विरोधात शोभा सरफळे 4788 यात 1295 मतांची आघाडी घेत जगन्नाथ धनावडे विजय ठरले त्याच बरोबर सगळ्यांचे खरे लक्ष वेधून राहिलेल्या आंबेवाडी गणात मोठी चुरशीची लढत झाले असे बोलले जात होते मात्र या मतदार संघात संजय मांडुळस्कर यांना 5696 यांचे विरोधी उमेदवार सुरेश दादा महाबळे यांना 4604 संजय मांडुळस्कर यांनी 1092 मतांची आघाडी घेत अखेर या गणाचे शिल्पकार हे संजय मांडुळस्कर ठरत विजय मिळवला आहे..
निवडणुकीत विरोधकांच्या वल्गना ठरल्या फोल विरोधकांचा धुव्वा आंबेवाडी मतदार संघ कायम तटकरेंचा बालेकिला समजला जातो तो कायम पुन्हा येथील कार्यकर्त्यांनी शाबुत ठेवल्याचे दिसून आले.सदरच्या निवडणुकीत पक्षाचे नेते राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शाखाली तसेच आमचे सर्वेसर्वा नेते लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या तसेच मंत्री अदिती तटकरे माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या नेतृत्वाखाली या गटात आणि गणात केलेल्या विकासाचीच खऱ्या अर्थाने मतदारांनी पोच पावती दिले आहे तसेच वल्गना करणाऱ्या विरोधकांचा दारूण पराभूत करत नुसते घासून पुसून नाही तर ठासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार निवडून आणले असल्याचे युवा नेते महेंद्र पोटफोडे आणि विजयी उमेदवारांनी सांगितले...
