महाराष्ट्र वेदभुमी

कोण बोलतोय येणार नाय..,आल्याशिवाय राहणार नाय. सौ उर्वशी वाडकर जिल्हा परिषद निवडणूक 42 घोसाळे गटात दणदणीत विजय..

प्रतिनिधी नंदेश गायकर..., रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट आणि गणाच्या 2026निवडणूक पार पडल्या... महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या आ महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली सौ उर्वशी उद्देश वाडकर यांनी रायगड जिल्हा परिषद सदस्य पदासाठी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले होते... नामनिर्देशन पत्र शिवसेना पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आले होते... धनुष्यबाण या चिन्हावर त्या लढत होत्या... रोहा शिवसेना पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रत्येक वाडी आणि प्रत्येक गाव पिंजून काढत धुवांधार प्रचार करून उद्देश वाडकर यांनी आपल्या पत्नीच्या उमेदवारी साठी घेतलेली प्रचंड मेहनत शेवटी फळाला आली आणि 8394 इतक्या भरघोस मतांनी उर्वशी वाडकर  निवडून आल्या...अश्या प्रकारे आपल्या पारड्यात यशश्री खेचून आणली... जनमानसात असलेले प्रेम आणि आपुलकी उद्देश वाडकर यांनी राखत जनतेने त्यांना यशाचा कौल दिला... असे म्हटले तर वावगे ठरणार नाही...

Post a Comment

Previous Post Next Post