महाराष्ट्र वेदभुमी

धाटाव येथील नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क आधी लगीन लोकशाहीचे माझ्या हक्काच्या मतदानाचे

अनंता म्हसकर: (धाटाव रोहा): रायगड जिल्हा परिषद गटातील व पंचायत समिती गणातील वोटिंग चालू असतानाच रोहा तालुक्यातील धाटाव गाव येथील ऋतिक राजेंद्र जाधव या युवकाचं काल  रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील धाटाव गाव येथून वांदेली गाव येथे लग्न असताना वरात निघाली असून देखील मंडपामधून थेट मतदान केंद्रामध्ये गेले... आधी लगीन लोकशाहीचे माझ्या हक्काच्या मतदानाचे म्हणत या नवरदेवाने मतदानाचे कर्तव्य बजावले आहे यांचा शुभविवाह काल दि. 07/02/2026 रोजी वांदेली येथे होणार असून या नवरदेवाने सर्व विवाहाच्या कार्यक्रमाचे नियोजन बाजूला ठेवून आधी मतदान करण्याचा निर्णय घेतल्याने धाटाव येथील नागरिकांनी त्याचे मनापासून स्वागत केले... धाटाव येथे नवरदेवाने मतदान केंद्रात जाऊन लोकशाही बळकट होण्याच्या दृष्टीने लग्नाच्या मंडपात वरमाला टाकण्याच्या सकाळी एक तास अगोदर मतदानाचा हक्क बजावला... त्या वेळेस मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या नागरिकांनी अत्यंत उत्साहपूर्ण आनंदात आदराने टाळ्यांच्या गजरात नवरदेवांचे स्वागत केले... व लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन या नवरदेवान केलं आहे...तरी लग्नाच्या घाईत नवरदेव असून देखील आवर्जुन मतदानासाठी केंद्रावर हजर राहून असा संदेश दिला आहे की देशातील प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं असून. देशात लोकशाही बळकट करायची असेल तर प्रत्येकाने घराबाहेर पडावं आणि मतदान करावं तसेच दरम्यान आज रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धाटाव गावातील नवरदेव यांच्यामुळे  गावात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाले...

Post a Comment

Previous Post Next Post