रामटेक-तुमसर मार्गावर भीषण अपघात
धडकेत महिलेच्या जागीच मृत्यू ; तर पती गंभीर जखमी
प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक :- दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्यावर भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने मागून धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेच्या जागीच मृत्यू झाला. तर तिचे पती गंभीर जखमी झाले आहे. . हा अपघात मंगळवार (ता.१०) दुपारी साडेचारच्या सुमारास रामटेक -तुमसर महामार्ग मौजा किरणापुर (जं) परिसरात घडला... कुंती श्रीधर गाढवे (वर ४७) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे... पती श्रीधर गाढवे (वर ५०) असे गंभीर जखमीचे नाव आहे... नगरधन येथील सूर्यलक्ष्मी कॉटन मिल येथे स्थायी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कुंती गाढवे या आपल्या पती श्रीधर गाढवे यांच्यासह दुचाकी क्रमांक एमएच ४० बीटी ६१३० नी तुमसर जवळील मिटेवाणी येथे नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी जात असतांना रामटेक कडून तुमसर चा दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप गाडी क्रमांक सीजी ०७ डीसी ३७१६ ने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली... धडक इतकी भीषण होती की कुंती गाढवे दूरवर फेकल्या जाऊन रस्त्यावर आदळल्या. आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला... अपघातात गंभीर जखमी झालेले श्रीधर गाढवे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रामटेक शहरातील योगीराज हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. अपघातानंतर रस्त्यावर पडलेले महिलांचे रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह पाहून परिसरात संतापाची लाट उसळली... राज्यमार्गावर जमाव गोळा झाला... घटनेची माहिती अरोली पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठविण्यात आला... या घटनेने नंदापुरी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या प्रकरणाचा पुढील तपास अरोली पोलीस करीत आहेत...
