महाराष्ट्र वेदभुमी

उरण–करंजा येथील कोळी नाखवा मुलगा ते जनरल मॅनेजर! जितेंद्र नाखवाची गगन भरारी.

 


तरुणांसमोर आदर्श उदाहरण.

उरण दि २२(विठ्ठल ममताबादे): उरण–करंजा या समुद्रकिनाऱ्याच्या मातीत वाढलेला एक साधा कोळी नाखवा मुलगा...स्वप्न मात्र मोठं! लाटांशी झुंज देणाऱ्या कुटुंबातून आलेल्या या मुलाने आयुष्यातही तितक्याच धैर्याने संघर्ष केला... आज तोच मुलगा आंतरराष्ट्रीय आतिथ्य क्षेत्रात यश संपादन करत जनरल मॅनेजर पदावर विराजमान आहे...त्यांचे नाव आहे जितेंद्र नाखवा...

लहानपणापासूनच जितेंद्र नाखवा यांना कष्ट, शिस्त आणि जिद्द यांचे संस्कार त्यांचे आई-वडील रोहिदास नाखवा आणि लीला नाखवा यांच्याकडून मिळाले... त्यांच्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणानेच त्याच्या स्वप्नांना दिशा दिली... शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने हॉटेल इंडस्ट्रीत शेफ म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली... स्वयंपाकघरातील घाम, मेहनत आणि शिकण्याची ओढ यामुळे त्याने आपल्या कौशल्याची छाप उमटवली...

आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन मिळवण्यासाठी जितेंद्र नाखवा यांनी स्वित्झर्लंडमधील प्रतिष्ठित हॉस्पिटॅलिटी शिक्षण घेतले आणि जागतिक दर्जाचे प्रशिक्षण पूर्ण केले... त्यानंतर त्याने भारतात आणि परदेशात जगातील नामांकित हॉटेल ब्रँड्ससोबत काम केले — जसे की Hyatt, IHG, Radisson आणि Hilton. या आंतरराष्ट्रीय अनुभवामुळे त्याच्या नेतृत्व कौशल्यात आणि व्यवस्थापन क्षमतेत मोठी भर पडली...

भारताच्या विविध राज्यांत काम करताना त्याने स्थानिक खाद्यसंस्कृती आणि पाहुणचाराचे बारकावे आत्मसात केले... शेफ ते फूड अँड बेव्हरेज नेतृत्व असा प्रवास करताना त्याने टीम बिल्डिंग, ऑपरेशन्स आणि अतिथी समाधानात नवे मानदंड निर्माण केले... विविध संस्कृतींमध्ये काम करत त्याने जागतिक दर्जाचे व्यवस्थापन कौशल्य विकसित केले आणि संघटनेला नवी दिशा दिली...

या संपूर्ण प्रवासात जितेंद्र नाखवा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली त्याची पत्नी पूजा नाखवा आणि त्याची लाडकी मुले... त्यांच्या प्रेम, संयम आणि पाठिंब्यामुळेच त्याला प्रत्येक कठीण क्षण पार करता आला...तो नेहमी म्हणतो “आज मी जे काही आहे, ते माझ्या कुटुंबामुळे आहे; हे यश पूर्णपणे त्यांच्यासाठीच आहे...”

आज उरण–करंजाचा तोच कोळी नाखवा मुलगा, आपल्या विश्वास, जिद्द आणि अथक परिश्रमांच्या जोरावर जनरल मॅनेजर पदावर पोहोचला आहे. त्याचा प्रवास केवळ वैयक्तिक यश नाही, तर प्रत्येक तरुणासाठी प्रेरणा आहे — की स्वप्न मोठं असलं की पार्श्वभूमी अडथळा ठरत नाही.समुद्राच्या लाटांवर वाढलेला हा मुलगा आज यशाच्या शिखरावर उभा आहे. हे यश त्याच्या आई-वडील, पत्नी आणि मुलांना अर्पण असल्याचे जितेंद्र नाखवा यांनी सांगितले.जितेंद्र नाखवा हे अतिशय कठीण परिस्थितीत संघर्ष करत त्यांनी हे यश प्राप्त केल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तरुणांपुढे एक चांगला आदर्श ठेवल्याने तरुण वर्ग त्यांच्या कार्याने, त्यांच्या विचारांनी प्रभावित झाला आहे...

दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी CMO Asia यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात Taj Lands End येथे जितेंद्र रोहिदास नाखवा यांना “Asia’s Most Admired General Manager 2026” या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...

शेफ म्हणून कारकिर्दीची सुरुवात करून, फूड अँड बेव्हरेज क्षेत्रातील समृद्ध अनुभव घेत, आज जनरल मॅनेजर पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा जिद्द, सातत्य, नेतृत्व आणि उत्कृष्टतेचा आदर्श नमुना आहे...

हा सन्मान त्यांच्या २३ वर्षांच्या अथक परिश्रमांची आणि आतिथ्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची पावती आहे. त्यांच्या या यशामूळे उरणचे नाव  आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post