कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक तडवी यांच्यावर अन्याय होत असल्याचे अनेक न्युज चॅनेलच्या माध्यमातून संपुर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडालीय..
शहानवाज मुकादम/रोहा
महाड: शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून, सततच्या जातीवाचक अपमान आणि मानसिक छळामुळे कुटुंबासह आयुष्य संपवण्याचा इशारा दिला असल्याचे अनेक न्युज चॅनेलच्या माध्यमातून समोर येत आहे...
रायगड जिल्हा पोलीस दलात सध्या मोठी खळबळ उडाली असल्याचे चर्चा ऐकावयास मिळत आहे...
महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहून, सततच्या जातीवाचक अपमान आणि मानसिक छळामुळे कुटुंबासह आयुष्य संपवण्याचा इशारा दिल्याने हा प्रकार गंभीर वळणावर गेला असल्याची चर्चा नागरिकांकडून नाक्या नाक्यावर बोलण्यातून समोर येत आहे...
रमेश तडवी यांची 17 जानेवारी 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण येथून रायगड जिल्ह्यात बदली झाली असुन 31 जानेवारी 2024 रोजी त्यांची महाड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती...
रमेश तडवी यांनी पोलीस निरीक्षक म्हणून सामान्य नागरिकांबरोबर आणि पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर आपुलकीची वागणूक कायम ठेवल्याने रमेश तडवी यांची एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली आहे...खऱ्या अर्थाने कर्तव्यनिष्ठ आणि निर्भय अधिकारी कसे असतात याचे उदाहरण म्हणजे पोलीस निरीक्षक रमेश तडवी...
तडवी यांनी आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही, त्यांच्यासाठी पद नव्हे तर संविधानाप्रती असलेली निष्ठा महत्त्वाची आहे...कायदा कोणासाठीही वेगळा नसतो, प्रभाव, सत्ता किंवा जवळीक यापैकी कोणतीही गोष्ट जबाबदारीपेक्षा मोठी नाही...पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी महाड शहर पोलिस ठाण्यातील कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्यांनी पोलीस सेवेची निष्पक्षता अधोरेखित करून त्यांनी दाखवून दिले की कायदा हा व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ असतो, असे स्थानिक पोलीस कर्मचाऱ्याकडून आणि नागरिकांकडून ऐकावयास मिळत आहे...
पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा प्रवास सांगतो की धैर्य म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य गोष्टीसाठी ठाम उभे राहणे... बदल्या येतात-जातात, पण मूल्ये आणि ध्येय कायम राहतात... प्रामाणिकपणा मार्गदर्शक असेल, तर इतिहास आपोआप नोंद घेतो...
त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात नव्यानेच रुजू झालेल्या पोलीस अधिक्षक श्रीम आँचल दलाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनानुसार आणि रायगड जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांकडून सामान्य नागरिकांबरोबर आपुलकीचे संबंध कायम करत प्रत्येक गावागावातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यास जी वागणूक मिळत आहे ती याआधी केवळ ऐकावयास मिळत होती, दोन वर्षानंतर ही तक्रारी अर्जावर दखल घेण्यात येत नव्हती, मात्र पोलीस अधिक्षक श्रीम आँचल दलाल रायगड जिल्ह्यात आल्यावर प्रत्येक पोलीस ठाण्यात सामान्य नागरिकांना न्याय मिळत असल्याचे पहाव्यास मिळत असुन त्यामध्ये प्रथम क्रमांकावर रोहा पोलीस स्टेशन, कोलाड, माणगाांव, महाड,पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, नागोठणा, पाली, मुरुड, रेवदंडा,अलिबाग, पोयणाड व पेण या सर्व पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकांचा समावेश असून प्रामाणिक कार्य करणारे आमचे पोलीस निरीक्षक यांच्यावरच जर का असे अन्याय होत असतील तर सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध नागरिकांना न्याय कोण देणार?...
पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांच्यावर अन्याय होणार नाही, याची दखल रायगडच्या पोलीस अधिक्षक श्रीम आँचल दलाल मॅडम घेतील अशी आपेक्षा सामान्य नागरिकांकडून होत आहे...
तसेच पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी ही त्यांच्या सहकुटुंबाची काळजी घेऊन कोणतीही टोकाची भुमिका न घेता नेहमीप्रमाणेच जनतेची सेवा करत रहावे अशी रायगडच्या जनतेला आपेक्षा आहे...
