महाराष्ट्र वेदभुमी

हे आहेत कोलाड विभागातील एक दानशूर व्यक्तिमत्त्व,

 


कोलाड वार्ताहर: कोलाड विभागातील दानशूर व्यक्तिमत्त्व आणि तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे तसेच कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात अल्पावधीत उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या सत्कर्याने लोकांच्या मनात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवणारे सन्माननीय  श्री. प्रमोदशेठ अनंतराव म्हसकर पुरस्कृत मराठी उद्योजक...यांच्या विशेष सहकार्य तसेच त्यांच्या शुभ हस्ते कोलाड विभागातील गोर - गरीब,गरजू लोकांना ब्लँकेट चटई, तसेच महिला बचत गट, वारकरी संप्रदाय सतरंजी वाटप असा कार्यक्रम कोलाड क्रिकेट असोसिएशन २४ गाव कामेटी माध्यमातून रविवार दि. ११/ १/२०२६  रोजी कोलाड मोहल्ला मैदान याठिकाणी  सायंकाळी ४.०० वाजता करण्यात येणार आहे... गोर - गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा असे मानणारे प्रमोदशेठ म्हसकर यांच्या माध्यमातून असे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम केले गेले आहेत... समाज सेवेचे व्रत हाती घेतलेले प्रमोडशेठ म्हसकर यांच्या हातून अशीच अखंड सेवा घडो,आणि यशाची उंच उंच शिखरे पादक्रांत करो, अशी जनमानसातून गणेश चरणी प्रार्थना करण्यात येते..!

Post a Comment

Previous Post Next Post