आदिवासी वनहक्क मिळालेल्यांची नावे चढवून धान खरेदी करा
उदयसिंग यादव यांची तहसीलदारांकडे मागणी
प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेक:-तालुक्यातील आदिवासी बहूल देवलापार भागातील आदिवासी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांची तसेच त्यांचे वारसांची नावे चढवून त्यांचे धान सरकारी धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्याकरीता परीसरातील शेतकऱ्यांसह भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांनी नायब तहसीलदार भूरे यांना निवेदन दिले... तसेच सदरचे पट्टे वाटप केल्यानंतरही त्यांचे नाव त्यांचे जमिनीवर चढले नसल्याने याबाबतचे शिबीर लावण्याची विनंती महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे केली.याबाबत लवकरच शिबीर लावून ही समस्या मार्गी लावण्यात येणार असल्याची ग्वाही महसुल मंत्री बावनकुळे यांनी दिल्याची माहिती भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांनी दिली. देवलापार परीसरातील आदिवासींना वनहक्क कायदा २००६ नुसार सन २०२० पूर्वीच वनजमीनिचे पट्टे वाटप करण्यात आले परंतू पाच वर्षे लोटूनही शेतकरी व त्यांचे वारसांचे नाव त्यांचे जमिनीवर चढविण्यात आलेले नाही... त्यामुळे या शेतकऱ्यांना त्यांचे धान आदिवासी विकास महामंडळाच्या तसेच पनन महासंघाकडे नोंदणी करून धान विकता येत नाही... पाच वर्षापेक्षा जास्त वेळ लोटूनही या शेतकऱ्यांची नावे जमीन न करण्यात आल्याने ते धान विक्री करीता नोंदनी करू शकले नाही... नोंदणीची शेवटची तारीख ३१ डिसेंबर होती... परंतू शेतकऱ्यांच्या ७ व १२ वर नावे नसल्याने नोंदणी करता आली नाही... देवलापार परीसरातील नागरीक वन्यजीवांच्या प्रकोपामूळे त्रस्त आहेत... वन्यप्राण्यांमूळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान होत आहे...परीसरात सिंचनाची पुरेशी सोय नाही व त्यात या शेतकऱ्यांना वाचलेले धान तरी सरकारी धान खरेदी केंद्रावर विकता सुद्धा येत नसेल तर हे दुर्दैवत मानावे लागेल...
आदिवासी वनहक्क कायद्यातंर्गत शेतकऱ्यांना पट्टे देण्यात आले परंतू अद्यापही त्यांची व त्यांचे वारसांची नावे चढविण्यात आलेली नाही... याबाबत महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली त्यांनी शिबीर लावून ही समस्या सोडविण्यात येणार असल्याचे सांगीतले... उदयसिंग यादव उपाध्यक्ष, नागपूर जिल्हा भारतीय जनता पार्टी
