प्रतिनिधी नंदेश गायकर/अनिल सालावकर.. रोहा तालुक्यातील चनेरे गावचा सुपुत्र श्री.अभिजीत अनंत देसाई हा नवी मुंबई निवडणूक 2026च्या प्रभाग क्रमांक 22ड मधून भरघोस मतांनी विजयी होऊन नवी मुंबई नगरपालिकेत नगरसेवक पदी विराजमान झाला आहे... आपल्या राजसाहेब ठाकरे यांच्या मनसे पक्षाच्या वतीने चुरशीची लढत देत एक सच्चा मनसैनिक अशी भूमिका साकार करण्यात यशस्वी झाला आहे... त्याच्या प्रभागातील विकास कामे करून त्याच्या विश्वासावर आणि त्याच्या कार्यपद्धती वर खुश होऊन जनतेने दिलेला हा कौल आहे... असे म्हणणे वावगे ठरणार नाही... रोहा तालुक्यातील मौजे चनेरे ही आपली जन्मभूमी असली तरीही कर्मभूमी नवी मुंबईत निवडणुकीला सामोरे जाणे म्हणजे विरोधकाना शह देणे हा मोठा विषय आहे... त्यांच्या अटीतटीच्या सामन्यात विजय आपल्या मनसैनिकाचा झाला हा आनंद त्याच्यापेक्षा राजसाहेबांना तिपटीने असेल... मनसेच खणखणीत नाणे नवी मुंबई महानगर पालिकेत वाजणार, घासून नाही रे ठासून आला अश्या आशयाचे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत...
