महाराष्ट्र वेदभुमी

मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रमुख मागण्यासाठी आंबेवाडी नाक्यात तिसऱ्या दिवशीही साखळी उपोषण

 

दुकाने बंद करून व्यापाऱ्यांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद,

 पुगांव रोहा(नंदकुमार कळमकर): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील आंबेवाडी कोलाड वरसगांव येथिल VUP उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला २०० मिटर अंतरावर अंडरपास बोगदे देण्यात यावे, सर्विस रोडचे काम आजपर्यंत पुर्ण झाले नाही ते काम पूर्ण करून देणे,गटारावरील झाकणे बसवून देणे, तसेच सदर अंडरपास पेण,नागोठणा, लोणेरे,महाड येथे ठेवले आहेत तसेच आंबेवाडी नाक्यावर व्हावे अशा विविध मागण्यासाठी आंबेवाडी बाजारपेठेतील द.ग.तटकरे चौकात आंबेवाडी कोलाड वरसगाव पंचक्रोशीतील सर्व जागरूक नागरिक यांनी  तिसऱ्या दिवशी ही साखळी उपोषण सुरु ठेवले असुन तिसऱ्या दिवशी सकाळी ११ ते दु. २ वाजेपर्यंत आंबेवाडी वरसगांव बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी साखळी उपोषणाला उत्स्फूर्त  प्रतिसाद दिला...

   आंबेवाडी वरसगांव येथील बाजारपेठेतील वरील सर्व मागणीसाठी गेली तीन दिवसापासून साखळी उपोषण सुरु असुन या उपोषणास व्यापारी वर्गासह कोलाड परिसरात असंख्य नागरिकांनी उत्स्फूर्त पाठींबा दिला... यावेळी माजी सरपंच सुरेशदादा महाबळे,चंद्रकांत लोखंडे,गणेश शिंदे,चंद्रकांत जाधव, संजय कुर्ले, महेंद्र वाचकवडे,विजय बोरकर,भाऊ गांधी, मिलिंद कदम,जेष्ठ पत्रकार कांतीलाल गांधी,ज्ञानेश्वर खामकर, विष्णु महाबळे, दगडू हाटकर, भावेश जैन,  मयूर जैन, तसेच व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, टेम्पो संघटना, कोलाड परिसरातील विविध क्षेत्रातील असंख्य नागरिक उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post