लक्षवेधी प्रतिकृतींद्वारे चिमुकल्यांनी वेधले लक्ष
समर्थ प्रा. शाळेत विज्ञान व गणित प्रदर्शन
प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक :- शहरातील समर्थ प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी भव्य विज्ञान व गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाला विद्यार्थी आणि पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला... प्रदर्शनीत चिमुकल्यांनी तयार करून आणलेल्या प्रतिकृतीनी प्रमुख पाहुण्यासह पालकांचेही लक्ष वेधले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आणि दीपप्रज्वलन समर्थ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रसाद किंमतकर, सचिव ऋषिकेश किंमतकर, हायस्कुलच्या प्राचार्या लोखंडे मॅडम, कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका घोष मॅडम, विद्या किंमतकर, समर्थ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कविता जोंजाळ मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले... सर्व पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रतिकृतींचे निरीक्षण केले तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या प्रतिकृतींचे वैशिष्ट्य सांगून उत्तमरित्या सादरीकरण केले...
यावेळ उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करून मार्गदर्शन केले केले... तसेच पत्रकार पंकज बावनकर यांनी विद्यार्थ्यांच्या सामाजिक भान जपणाऱ्या प्रयोगांचे विशेष कौतुक केले... या प्रदर्शनात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता... यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण रक्षण आणि सौर ऊर्जा, पाण्याचे नियोजन आणि सांडपाणी व्यवस्थापन, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि रोबोटिक्स, गणितीय मॉडेल यांच्यासह इतर अनेक विषयावर या आधारित मॉडेल्स (प्रतिकृती) मांडण्यात आले होते... या विज्ञान प्रदर्शनित एकूण ४५ विज्ञानाच्या प्रतिकृती व ३५ गणिताच्या प्रतिकृती चे सादरीकरण करण्यात आले... या विज्ञान व गणित प्रदर्शनीलां विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला... विज्ञान प्रदर्शनी यशस्वीरित्या पार पाळण्याकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका कविता संदीप जौजाळ सर्व शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले...
