महाराष्ट्र वेदभुमी

युको बँकचा ८४ वा स्थापना दिन उत्साहात साजरा

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक : युको बँकेचा ८४ स्थापना दिवस मंगळवार (ता.६) जानेवारीला उत्साहात साजरा करण्यात आला. स्थापना दिनानिमित्त सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र नगरधन येथील परिसरात युको बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक आशिष कुमार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले... पर्यावरण संवर्धनाच्या संदेश देत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली... बँकेच्या शाखेत केक कापून स्थापना दिवसाच्या कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला... वरिष्ठ व्यवस्थापक आशिष कुमार यांनी आपल्या भाषणातून युको बँकेच्या इतिहास कार्यपद्धती तसेच ग्राहकासाठी उपलब्ध असलेल्या विविध बँकिंग सुविधा यांची सविस्तर माहिती दिली... या बँकेची स्थापना घनश्यामदास बिर्ला यांनी ०६ जानेवारी १९४३ मध्ये केली १९६९ साली बँकेचे राष्ट्रीयकरण झाले झालेले यश हे सर्व बँकेचे विश्वासू खातेदार व सेवक यांची आहे... बँकेत काम करत असताना प्लॅनिंग व मॅनेजमेंट या गोष्टीना अनन्यसाधारण महत्त्व आहे... ग्राहकांना विविध प्रकारच्या कर्ज योजनांची माहिती देत गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यवसाय कर्ज आधी सर्व प्रकारची कर्जे नगरधन शाखेत उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले... कर्ज मिळवण्यासाठी आता कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला... खातीदारांचे बँकिंग पलीकडे नाते असल्यामुळे खातेदारांना बँकेत व्यवहार करण्यास सोपे जाते, त्यामुळे बँकेच्या नावलौकिक वाढत आहे. स्थापना दिनाच्या निमित्ताने साकेत येणाऱ्या सर्व ग्राहकांचे तोंड गोड करण्यात आले ग्राहकांनी बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देत समाधान व्यक्त केले... स्थापना दिवस कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता बँकेचे वरिष्ठ लिपिक संजय बोरकर सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले...

Post a Comment

Previous Post Next Post