वाघ जेरबंद पण प्रश्न मात्र अजून जिवंत...!
प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक:- तालुक्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सिमेलगतच्या देवलापार येथील सिल्लारी पिपरिया गावात संगीता गोपीचंद वघारे (वय ४०) वर्ष यांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक टियूआय ०८ वाघीण अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकली... सिल्लारी -पिपरिया शेतशिवारात परिसरात नरभक्षक टियूआय ०८ वाघीणने धुमाकूळ घातला यामुळे शेतकरी, मजूर दहशतीत होते... या घटनेनंतर गावकऱ्यांचा वनविभागाप्रती रोष उफाळून आला... वनविभागाने पगमार्क तपासणी, कॅमेरा ट्रॅप आणि क्षेत्रीय निरीक्षणाच्या आधारे तपास सुरू केला... या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली... घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक अक्षय गजभिये यांच्या मार्गदर्शनात तातडीने शोध मोहीम राबविण्यात आली... विभागाच्या तांत्रिक पुराव्याच्या आधारावर वाघाचा मार्ग शोधून काढला... घटनास्थळावरील ठशाची तपासणी केली... कॅमेऱ्यातील फुटेजवरून हल्लेखोर वाघिण 'टीयुआय-०८' असल्याचे स्पष्ट झाल्याने सहाय्यक वनरक्षक पूजा लिंबगावकर, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर, जयेश तायडे तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोलंगथ व श्रीकांत ढोबळे यांनी वाघिणीला जेरबंद केले... या वाघिणी अत्यंत हिंसक झाली होती... त्या वाघिणीने दोन महिन्यात परिसरात दहशत पसरविलेली होती... (दि.२८) आँक्टोबरला झिंजेरीया येथील काशिनाथ इनवाते तर (दि.०५) डिंसेबरला मौदी येथील अशोक उईके नावाच्या व्यक्तीलाही ठार केले... मानव व शिकारीसोबतच या वाघिणीने अनेक पाळीव प्राण्यांना अन्य प्राण्यांवरील देखील हल्ले केलेले आहे... पेंच व्याघ्र प्रकल्पातील या घटनेबद्दल तीव्र शोक आहे... मृतकाच्या कुटुंबाला सरकारी नियमानुसार सर्व आवश्यक मदत देण्यात येणार आहे... अशा संवेदनशील काळात सुरक्षा नियमाचे पालन करावे आणि वन कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे...
