सोगाव - अब्दुल सोगावकर :अलिबाग तालुक्यातील धेरंड येथे गुरुवार दि. ९ जानेवारी २०२६ रोजी ग्रामस्थ मंडळ धेरंड व शाळा व्यवस्थापन समिती धेरंड, शिक्षक वृंद पेझारी यांच्या संयुक्त विद्यमाने धेरंड गावात आनंददायी बाल मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला...
यावेळी या आनंददायी बाल मेळाव्याची सुरुवात ग्रंथ दिंडीने करण्यात आली, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभियान अंतर्गत धेरंड गावात ढोल ताशांच्या गजरात ग्रंथ दिंडी काढण्यात आली... या बाल मेळाव्याचे उद्घाटन सुनील गवळी - गट शिक्षणाधिकारी मुरुड, यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कृष्णा पिंगळा - गटशिक्षणाधिकारी अलिबाग, विनोद पाटील - बीट विस्तार अधिकारी पोयनाड, श्रीमती मनीषा टेमकर मॅडम - केंद्रप्रमुख पेझारी, ग्रामस्थ मंडळी धेरंड, साधन व्यक्ती यामिनी पाटील व मनीषा पाटील मॅडम, विश्वनाथ म्हात्रे सर, चेतन पाटील सर, सदानंद कमल पाटील सर, जो.जा. पाटील सर व धेरंड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते... धेरंड गावातील महिलांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे औक्षण केले तसेच सर्व मान्यवरांचे शाल व पुष्परोप देऊन पेझारी केंद्राच्या वतीने स्वागत करण्यात आले... केंद्रप्रमुख श्रीमती मनीषा टेमकर मॅडम यांनी केंद्रातील दोन शिक्षकांना 'केंद्रस्तरीय गुणवंत शिक्षक' हा पुरस्कार देऊन सन्मानित केले... यामध्ये रा.जि.प.शाळा मोठे शहापूर शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील सर व रा.जि.प. शाळा पेझारी शाळेतील विषय शिक्षिका नीलिमा पाटील मॅडम यांना पुरस्कार देण्यात आले... याचवेळी दोनही गुणवंत शिक्षकांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करून सत्कार करण्यात आले...
ग्रंथ दिंडी नंतर पेझारी केंद्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर समूह नृत्य सादर केले... ह्या समूह नृत्यातील विद्यार्थ्यांना धेरंड ग्रामस्थांच्याकडून एक ट्रॉफी देण्यात आली व तसेच ज्ञानवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा भगत मॅडम यांच्याकडून एक ट्रॉफी देण्यात आली... यासोबतच सर्व विद्यार्थ्यांना पेझारी शिक्षक वृंदाकडून शैक्षणिक साहित्य देण्यात आले. प्रत्येक शालेय बाल मेळावा मध्ये खाऊचा एक स्टॉल लावला होता, त्यामुळे मुलांना खरेदी विक्रीचा आनंद घेता आला, तसेच त्यांना प्रत्यक्ष व्यवहार करताना मुलांना खूप आनंद झाला... दुपारी धेरंड ग्रामस्थांकडून सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षक, पालक यांच्यासाठी शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती... दुपारनंतर विद्यार्थ्यांचे फनी गेम घेण्यात आले, यानंतर सर्व विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण समारंभ पेझारी केंद्र शिक्षक वृंदा मार्फत करण्यात आला... या बाल आनंददायी मेळाव्यासाठी धेरंड ग्रामस्थ, धेरंड शाळेचे मुख्याध्यापक उमेश पाटील सर व उपशिक्षिका श्रीमती आकांक्षा वर्तक मॅडम यांनी विशेष मेहनत घेतली... या बाल मेळाव्याचे सूत्रसंचालन सुप्रिया पाटील मॅडम यांनी केले... अतिशय उत्साहात पेझारी केंद्राचा बाल आनंद मेळावा संपन्न झाला... सर्व शिक्षकांनी धेरंड ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानले व असेच सहकार्य कायम मिळत राहो, ही अपेक्षा व्यक्त केली...
फोटो लाईन - धेरंड येथे बाल मेळाव्यात उपस्थित मान्यवर, शिक्षक वृंद व विद्यार्थी.
