प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक : येथील रिआन हॉस्पिटलमध्ये एका ५३ वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल १० किलो वजनाचा गर्भपिशवीतील (ओव्हरियन) ट्युमर यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे काढून तिचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. ही अवघड शस्त्रक्रिया रिआन हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रदीप बोरकर व त्यांच्या चमुने यसस्वी रित्या पूर्ण केली. पोटात तीव्र वेदना व प्रचंड सूज जाणवत असल्याने महिला १० जानेवारी रोजी रिआन हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रदीप बोरकर यांच्याकडे तपासणीसाठी आली होती. तपासणीनंतर करण्यात आलेल्या सोनोग्राफी व सिटी स्कॅनमध्ये तिच्या गर्भपिशवीत ३४ ते ३६ सेंटीमीटर आकाराचा मोठा ओव्हरियन ट्युमर आढळून आला... ही स्थिती गंभीर असल्याने तातडीने शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला... रुग्ण व कुटुंबीयांच्या संमतीनंतर १२ जानेवारी रोजी डॉ. प्रदीप बोरकर व त्यांच्या अनुभवी वैद्यकीय पथकाने लॅप्रोटॉमी शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातून सुमारे १० किलो वजनाचा ट्युमर सुरक्षितरीत्या काढला. ही शस्त्रक्रिया अत्यंत जटिल व आव्हानात्मक होती... मात्र डॉक्टरांच्या कौशल्यामुळे व टीमवर्कमुळे शस्त्रक्रिया यशस्वी ठरली... उपचारानंतर महिला पूर्णपणे बरी होऊन १७ जानेवारी रोजी घरी परतली... घरी जाताना तिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद समाधानकारक होता. महिलेच्या कुटुंबीयांनी डॉ. बोरकर, त्यांच्या टीमचे व कर्मचाऱ्यांचे आभार मानले...
