रिपोर्टर:- श्याम लोखंडे रोहा रायगड : रोहा तालुक्यातील खांब विभागातील इंग्रजी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मंजुळा नारायण लोखंडे एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लीश स्कूल खांब येथे देशाचा ७७ वा.प्रजाकसत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला...
देशाचे ७७ व्या प्रजाकसत्ताक दिनानिमित्त या शाळेचे ध्वजारोहण पुई गावचे सुपुत्र माजी सैनिक तथा रायगड पाटबंधारे काळ प्रकल्प विभागाचे कालवा निरीक्षक अधिकारी निलेश मधुकर दिसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी हभप नारायण महाराज लोखंडे,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे उपाध्यक्ष सुधीर लोखंडे,डॉ. श्यामभाऊ लोखंडे,श्रीराम कचरे,भाऊसाहेब धनावडे.संतोष महाडिक,किशोर सावरकर,अमित भोईर,सुर्यकांत पोटफोडे,कृष्णा वारगुडे,प्रविण पोटफोडे, कोकाटे, मुरलीधर सावंत,महेंद्र वाघमारे,किशोर शिद,वसंत शिद, प्रदिप मरवडे,प्रणाली धनावडे,आरती तुपकर,अर्चना परबलकर,अश्विनी वेदक, स्वप्नाली पाटील,रेखा विश्वकर्मा,रिया लोखंडे मुख्याध्यापिका,सोनाली शिंदे, प्रतिक्षा धामणसे,रुपाली मरवडे,दर्शना धनवी,प्रियंका चिकणे.सायली म्हात्रे,मनाली देशमुख, करिश्मा घरत,ज्ञानेश्वर महाडिक,श्रुती वाजे,विक्रांत गुरव, सचिन गोळे सह आदी विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते...सुत्रसंचालन आर्या चितळकर,श्रेया भोसले. आदी विद्यार्थी शिक्षक वर्ग बहुसंख्येने उपस्थीत होते...
सोमवारी २६ जानेवारी रोजी देशाच्या ७७ व्या प्रजाकसत्ताक दिनानिमित्त येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून विविध कला सादर करत मराठी हिंदी इंग्रजी भाषेत प्रजाकसत्ताक दिनाबद्दलचे महत्व पटवून दिले तसेच विविध कला सादर करत देशातील विविध राज्यातील वेशभूषा कल्चर याचे सादरीकरण केले. या प्रसंगी परीट सलामी,लेझिम, पालकांची बाईक रॅली,शेतकऱ्यांची बैल गाडी आणि विद्यार्थ्यांनी बळीराजासाठी केलेली कलाकृती ही शेतकरी पालकांसाठी प्रेरणादायी ठरली तर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले...
यावेळी डॉ. श्यामभाऊ लोखंडे, संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे,त्याच बरोबर प्रमूख पाहुणे लाभलेले माजी सैनिक निलेश दिसले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले...कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर्या चितळकर,श्रेया भोसले यांनी करत आभार मानले...
