महाराष्ट्र वेदभुमी

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा राज्यस्तरीय मेळावा मालेगाव येथे; तयारीसाठी महत्वपूर्ण बैठक संपन्न..!

पत्रकार कैलासराजे घरत: खारपाडा पेण : राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा 2026चा प्रथम राज्यस्तरीय मेळावा मालेगाव येथे दिनांक 22 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार असून, या मेळाव्याच्या आयोजन व नियोजनासंदर्भात मालेगाव येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली... ही बैठक मनमाड चौफुली येथील शुद्ध शाकाहारी माऊली हॉटेलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली... या बैठकीस संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.विजयजी सूर्यवंशी साहेब उपस्थित होते... प्रथम मालेगाव टीमच्या वतीने सूर्यवंशी साहेबांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला...

बैठकीत मेळाव्याच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी मालेगाव येथे संघाचे झालेले कार्यक्रम उल्लेखनीय ठरल्याचे सांगत, यंदाचा मेळावा अधिक भव्यदिव्य स्वरूपात यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला... कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण उत्तर महाराष्ट्र (खानदेश)विभागाची कार्यकारिणी सक्रिय सहभाग घेईल, असे आश्वासन देण्यात आले... तसेच नव्याने सक्रिय राहणाऱ्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांना 22 फेब्रुवारी रोजी नियुक्तीपत्रे देण्यात येतील, अशी माहिती विनायक माळी व ज्ञानेश्वर बागुल यांनी दिली... ज्येष्ठ पत्रकार कैलास माळी यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या... किशोर कापडणीस यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले...

मुकेश सोनवणे यांनी राजकीय व सामाजिक नेत्यांची उपस्थिती निश्चित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले... बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली... ज्ञानेश्वर माऊली यांनी उपस्थितांचे आभार मानले...

या बैठकीस उपस्थित पदाधिकारी :ज्ञानेश्वर बागुल, विनायक माळी, कैलास माळी, मुकेश सोनवणे, किशोर कापडणीस, मकबूल शेख, रविंद्र केदारे, प्रदीप देवरे, विजय त्रिमुखे आदी उपस्थित होते... मालेगाव व परिसरातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post