दि. 28जानेवारी 2026
मुंबई प्रतिनिधी: (सतिश पाटील): महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे.. ही भीषण दुर्घटना बारामती जवळ घडली लँडिंगच्या तयारीत असताना विमान अचानक खाली कोसळले आणि त्यानंतर भीषण स्पोट झाला या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह विमानातील सर्व प्रवाशांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार हे खाजगी एस आर कंपनीच्या विमानाने प्रवास करीत होते विमानात एकूण सहा जण होते हे विमान मुंबईवरून सकाळी 8:10 मिनिटांनी रवाना झाले होते... आणि8:50 वाजता बारामतीत लँडिंग होणे अपेक्षित होतं मात्र लँडिंगपूर्वीच विमानाचा अपघात झाला...
अपघातात सर्व मृत्युमुखी पडलेल्याची नावे :
अजित अनंतराव पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र
एच सी विदीप जाधव,मुंबई(पी एस ओ)
कॅप्टन सुमित कपूर (पायलट)
कॅप्टन शांभवी पाठक (को पायलट)
पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट) अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे...
नेमका अपघात कुठे आणि कसा झाला?
अजित पवार आज सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले... मात्र, तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोराने आदळले. विमान कोसळताच त्याने काही सेकंदातच भीषण पेट घेतला... बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि जळून खाक झाले. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट उठू लागले... ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली...
प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाले... अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे...
