महाराष्ट्र वेदभुमी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू, संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री काळाच्या पडद्याआड

रोहा, धाटाव, कोलाड मार्गावर सर्व  दुकाने दुकानगाळे, दुकानमालकांनी आपले व्यापार ठेवले बंद

रोहा धाटाव / अनंता म्हसकर: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दि. 28/01/2026 रोजी सकाळी सुमारे साडेआठच्या दरम्यान बारामती जवळ लँडिंग दरम्यान विमान दुर्घटना घडली... घडलेल्या दुर्घटनेत अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले... या  दुर्घटनेत एक धडाडीचा नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने अवघे महाराष्ट्र शोकाकुल झाले आहे... तरी राजकारणातील असे एक कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व रोखठोक स्पष्ट वक्ता जनतेचे प्रश्न निर्णायक सोडवून जनतेला ठाम दिलेला शब्द पूर्ण करणारे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री काळाच्या पडद्याआड गेल्याने या दुःखद प्रसंगी शोकाकुल असलेले सर्वच नागरिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस विजयराव मोरे व रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विनोद पाशिलकर तसेच सर्व कार्यकर्ते यांनी श्रद्धांजली दिली व तसेच सर्व जनता शोकाकुल असल्याने रोहा तालुक्यातील रोहा तसेच धाटाव व कोलाड मार्गावरील सर्व दुकानदार व दुकान गाळे मालक यांनी आपले व्यापार बंद ठेवले..



Post a Comment

Previous Post Next Post