मुंबई प्रतिनिधी :(सतीश पाटील): उरण तालुक्यातील केगांव-दंडा येथील रहिवासी आणि सेंट मेरी कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणाऱ्या आर्य किशोर पाटील याने जलतरण क्षेत्रात एक दैदिप्यमान कामगिरी केली आहे...
अवघ्या १३ वर्षांच्या आर्यने १८ डिसेंबर २०२४ रोजी धरमतर ते कासा खडक हे २४ किलोमीटरचे सागरी अंतर जलतरणातील अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या ‘बटरफ्लाय’ प्रकारात पोहून पार करत जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे... या साहसी मोहिमेसाठी त्याने मध्यरात्री २ वाजता समुद्रात झेप घेतली आणि अथांग लाटांचा सामना करत पहाटे ७:४० वाजता, म्हणजेच अवघ्या ५ तास ४० मिनिटांत आपले लक्ष्य गाठले...
उघड्या समुद्रामध्ये बटरफ्लाय स्ट्रोकने एवढ्या लांब पल्ल्याचे अंतर पार करणारा तो जगातील सर्वात लहान जलतरणपटू ठरला आहे... त्याच्या या अभूतपूर्व कामगिरीची दखल घेत त्याला ’इंटरनॅशनल एक्सिलेन्स अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले असून, त्याचे नाव ’इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्येही अभिमानाने नोंदवले गेले आहे. आर्यच्या या यशाने केवळ उरणचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल झाले आहे... आर्य यास उरणच्या नगराध्यक्षा मा. सौ. भावनाताई घाणेकर यांनी भेटून शुभेच्छा दिल्या...
