महाराष्ट्र वेदभुमी

भुवनेश्वर गटातून शिवसेनेचे निलेश शेठ वारंगे यांच्या नावाची जोरदार चर्चा: तिरंगी लढत होण्याची शक्यता

रोहा (प्रतिनिधी) :रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले आहे, रोहा तालुक्यात भुवनेश्वर गटात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे... भुवनेश्वर गटाकडे सर्वांचे लक्ष लागले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मधुकर पाटील, भाजपाकडून अमित घाग निवडणूक लढवणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे...

 या मतदारसंघात अटीतटीची लक्षदेवी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, शिवसेना धाटाव विभाग प्रमुख निलेशशेठ वारंगे निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता निर्माण झाली आहे... तरुण मराठी उद्योजक निलेश शेठ वारंगे यांना वाढता पाठिंबा पाहायला मिळत आहे... निलेश शेठ वारंगे यांच्या नावाची चर्चा होताच गावा गावात तरुणांमध्ये उत्साहाचे वातावर निर्माण झाले आहे, जिल्ह्याचा लक्षवेधी असा हा भुवनेश्वर गट मतदार संघ आहे, युती, आघाडी न झाल्यास जिल्ह्याला एक अटीतटीची लक्षदेवी लढत पाहायला मिळेल... तिन्ही उमेदवार प्रतिष्ठित, नावलौकिक मिळवलेले, जनतेच्या मनावर राज्य केलेले आहेत, यातच निलेशशेठ वारंगे यांनी काही महिन्यांपूर्वी शिंदे शिवसेना गटात पक्ष प्रवेश केला आहे, ऍड.मनोज कुमार शिंदे, आमदार महेंद्र शेठ दळवी मंत्री भरत शेठ गोगावले यांचे ते जवळचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत... सर्व नेत्यांनी विशेष लक्ष या जिल्हा परिषद मतदार संघात दिला आहे... त्यामुळे निलेशशेठ वारंगे यांचे पारडे जड झाले आहे,  मैत्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून निलेश शेठ वारंगे यांचे अनेक वर्षे सामाजिक कार्य सुरू आहे, विविध उपक्रम राबवत आहेत, गावागावात वाडीवस्तीवर जाऊन गोरगरीब जनतेला, मदतीचा हात पुढे करत आहेत, कोणता ही विद्यार्थी शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, त्यांच्यात शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांसह शाळेला शैक्षणिक साहित्यांचे मोठ्या प्रमाणात वाटप करत आहेत...

काही दिवसांपूर्वीच आमदार महेंद्र शेठ दळवी तालुका प्रमुख ॲड मनोज कुमार शिंदे यांच्या हस्ते तब्बल 35 मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले... त्यांच्या सामाजिक ,राजकीय कार्याचा वाढता आलेख पाहता पक्षश्रेष्ठी या मतदार संघात लक्ष देत आहेत, पक्ष नेतृत्वामुळे तरुणांना राजकारणात चांगली संधी उपलब्ध झाली असून नागरिकांच्या मनात निलेश शेठ वारंगे हे भावी उमेदवार म्हणून चर्चेत आहेत... युती आघाडी न झाल्यास तिरंगी लढतीत निलेश शेठ वारंगे बाजी मारणार असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे...

Post a Comment

Previous Post Next Post