महाराष्ट्र वेदभुमी

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) रायगड जिल्हा समितीचा निर्णय : अझर धनसेंवर कठोर कारवाई

माणगाव :- (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) रायगड जिल्हा समितीने श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अजर धनसे यांच्यावर पक्षविरोधी भूमिकेमुळे कारवाई जाहीर केली आहे... पक्ष जिल्हा समितीचे सचिव श्रीहर्ष  श्रीकांत कांबळे व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला... पक्षनिष्ठ भंग केल्याप्रकरणी तसेच धनसे यांनी पक्ष विरोधात गैरवर्तन केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे....

   श्रीवर्धन मतदारसंघातील नगरपरिषद निवडणुकीदरम्यान अजर धनसे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षकार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. पक्षविरोधी कृती आणि जनतेत पक्षाची बदनामी होईल अशी वक्तव्ये केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे... सर्व बाजूंचा सखोल तपास केल्यानंतर रायगड जिल्हा समितीने त्यांच्यावर शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला...

    यादरम्यान तपासात पुढील गंभीर मुद्दे उघडकीस आले: नगरपरिषद निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना न दिलेला पाठिंबा, कोणतीही सभा, प्रचारयोजना किंवा रॅली न करणे, उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यास मदत न करणे आणि जिल्हा पातळीवरील कार्यक्रमांकडे दुर्लक्ष करणे अश्या सर्व कारणांचा विचार करून जिल्हा समितीने अझर धनसे यांना पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही असा निर्णय जाहीर केला आहे.. तसेच त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांनीही संबंध ठेवू नये, असा आदेश संघटनेने स्पष्ट केला आहे... पक्षविरोधी वक्तव्ये, गटबाजी व पक्षहिताला बाधा आणणारी कोणतीही कृती सहन केली जाणार नाही, हे समितीने स्पष्ट केले आहे...

    पक्ष शिस्तपालन व संघटनात्मक बांधणी यांना प्राधान्य देत हा निर्णय १ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतरीत्या घेतला गेला असल्याचे जिल्हा सचिव श्रीहर्ष श्रीकांत कांबळे  यांनी कळविले... तसेच अशा प्रकारची कारवाई पक्षाच्या शिस्तबद्ध व स्वच्छ कार्यप्रणालीसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी दि. ०५ डिसेंबर, २०२५ रोजी काढलेला प्रसिद्धी पत्रक मध्ये कळविले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post