कैलासराजे घरत:(रायगड जिल्हा प्रतिनिधी): चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी... महिला विकास कक्ष, वीर स्वामी शैक्षणिक आणि सामाजिक विकास संस्था व महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने "महिलांकरिता कायदेविषयक जनजागृती, मान्टेसरी शिक्षणाचे महत्त्व व नारीभूषण सन्मान" सोहळ्याचे आयोजन नुकतेच चांगू काना ठाकूर आर्ट्स, कामर्स ॲन्ड सायन्स, खांदा येथे करण्यात आले होते...
यावेळी दीपप्रज्वलनाने सदरहु कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी माजी सहाय्यक पोलीस आयुक्त रेहना शेख, ॲड संगीता रोकडे, पनवेल महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ रेहाना मुजावर, जेष्ठ समाजसेविका इंदूमत्ती ठक्कर, चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या अध्यक्षा डॉ. रत्नप्रभा ठाकूर, महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेच्या सलमा खान आणि वीर स्वामी शैक्षणिक आणि सामाजिक विकास संस्थेच्या सचिव भाग्यश्री भुजबळ इत्यादी मान्यवर उपस्थित ह़ोते...
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेचे संस्थापक एन. डी. खान यांनी केले. ॲड संगीता रोकडे यांनी महिलाकरीता असलेल्या कायदया बद्दल उपस्थित महिलांना सखोल माहिती दिली... महिलांनी आपल्या अधिकारा विषयी जागृत राहण्याचे आवाहन केले... त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी माजी सहाय्यक आयुक्त यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महिलांनी आपल्या वर होणारे अन्याय विरुध्द नेहमीच आपल्या नारीशक्ती ने विरोध केला पाहिजे... तसेच वीर स्वामी शैक्षणिक आणि सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा.संजय हिरेमठ यांनी Montessory शिक्षणाचे महत्त्व या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले... सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून वीर स्वामी शैक्षणिक आणि सामाजिक विकास संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थीचा प्रमुख अतिथींचा सन्मान करण्यात आला... कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच. एन. पाटील यांनी समृद्ध भाषेत केले...
आपल्या उल्लेखनीय कामगिरी ने विविध क्षेत्र समृद्ध करणारे डॉ. रहेना मुजावर, प्रेमलता पाटील, पाकीजा अत्तार, ॲड सुरेखा भुजबळ, मनिषा ठाकूर, भाग्यश्री भुजबळ, रेशमा शेख, रजनी लोहकरे, कांचन वाघमारे, आजींना सराफ आणि मानसी नाईक यांना राष्ट्रीय नारीभूषण सन्मान पुरस्काराने प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानित आले... त्याचप्रमाणे पनवेल तालुक्यातील १५ बचतगटांचा त्या करीत असलेल्या महिला सक्षमीकरणाच्या कार्याबद्दल प्रमुख अतिथींच्या हस्ते राष्ट्रीय नारीभूषण सन्मान पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला... तसेच सदरहु कार्यक्रमा करीता फॅशन डिझायनर पूजा मन्डोरा, पत्रकार सुनिल भुजबळ, पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष देविदास गायकवाड, सह्याद्री परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार कांबळे, समाजसेविका वर्षा पाचभाई, मंजुषा कदम, सौ. छाया अक्कलकोटे, जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता शैलेंद्र अक्कलकोटे, अब्दुल गनी आत्तार, अब्दुल समद मुकादम, मोईन कुरेशी आणि शाहीदा इत्यादी मान्यवर उपस्थित होते...
