महाराष्ट्र वेदभुमी

रोहा ऐनवहाळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

कोलाड (श्याम लोखंडे): रोहा तालुक्यात बिबट्याचा हैदोस उडवणे बाहे पाठोपाठ आता खांब परिसरातील ऐनवहाळ भागात बिबट्या फिरकला असल्याने हद्दीत मंगळवारी २३ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने एका बैलावर हल्ला चढवला आणि या हल्ल्यात बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असुन सदरच्या या घटनेमुळे परिसरात तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे...

रोहा तालुक्यात काही दिवसांपूर्वी उडवणे बाहे या मार्गावरील डोंगर पायथ्याशी असलेल्या कालव्यातून सायंकाळच्या सुमारास एका इसमाला बिबट्याचे दर्शन घडले असल्याचे समोर आले असता तात्काळ वनभिगाने पाहणी  केली आणि त्या ठिकाणी बिबट्यांच्या पाऊलांचे ठसे आढळून आले आणि त्या परिसरात एकच खळबळ उडाली आणि भीतीचे वातावरण पसरले होते तर ती भीती मनातून जाते ना जाते पुन्हा बिबट्या फिरकला आणि चक्क एका शेतकऱ्याच्या बैलावर हल्ला चढवला मात्र यावर आता विभाग काय उपाय योजना करणार याकडे लक्ष लागले आहे...

तर ऐनवहाल, डोळवहाल, रेवेचीवाडी तसेच चिंचवली तर्फे अतोणे हा परिसर असंख्य गावे घनदाट जंगल भागात वसलेली आहेत... या परिसरात बिबटयाचे दशहद निर्माण झाली असल्यामुळे येथील जागृत नागरिकांनी वन विभाग, पोलिस अधिकारी, तसेच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था यांच्याशी संपर्क साधला असुन हे तिन्ही पथक घटना स्थळी दाखल झाले आहेत... त्यांनी बिबटयाची शोध मोहीम सुरु केली असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे...

या परिसरात बिबट्याने ऐनवहाल येथील पोलिस पाटील प्रकाश शांताराम मोरे यांच्या घरच्या गाईचा अंदाजे ३० हजार रुपये किंमतीचा खिल्लार बैल याचा बळी घेतला आहे.यामुळे या मार्गांवरून  शाळेत जाणारे विद्यार्थी, कामगार, तसेच शेतावर जाणारे शेतकरी, तसेच  मॉर्निंग वॉकला जाणारे जेष्ठ नागरिक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे...

प्रतिक्रिया 

रोहा तालुक्यातील ऐनवल येथे बैलाचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळे झाल्याचे बोलले जात आहे.मात्र या घटनेत बिबट्याचा सहभाग असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही, तर घटनेची याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती वनविभागाने दिली असून संबंधित शेतकऱ्याला वनविभागाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यात येईल, असेही आश्वासन वन विभागाच्या वतीने देण्यात आले आहे...

तर वनविभागाने येथील नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणतेही अप्रमाणित फोटो किंवा संदेश पुढे पाठवू नयेत. खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे...

Post a Comment

Previous Post Next Post