७५ किलो वजनी गटात विदेशी खेळाडूंना दिली कडवी झुंज
भारतीय नौदलात कार्यरत असलेल्या राकेशच्या कामगिरीमुळे देशात आनंदाचे वातावरण
उरण (प्रतिनिधी): सातासमुद्रापार स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये भारताचा तिरंगा डौलाने फडकला. ७व्या नॉर्डिक आंतरराष्ट्रीय वुशू चॅम्पियनशिपमध्ये (Nordic International Wushu Championship) भारतीय नौदलाचे खेळाडू राकेश मनोज बेदी यांनी देशाचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक पटकावले... त्यांच्या या शानदार विजयाने केवळ भारतीय नौदलच नव्हे, तर संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे...
ही आंतरराष्ट्रीय ७ वी नॉर्डिक वुशू स्पर्धा १२ डिसेंबर ते १४ डिसेंबर २०२५ दरम्यान स्वीडनच्या स्टॉकहोम येथे आयोजित करण्यात आली होती... राकेश बेदी यांनी वुशू खेळातील ७५ किलो वजनी गटात सहभाग घेतला होता... अटीतटीच्या सामन्यात आणि उत्कृष्ट तांत्रिक प्रदर्शनाच्या जोरावर त्यांनी हे कांस्यपदक मिळवले...
नौदलाचे शिस्तप्रिय प्रहरी राकेश मनोज बेदी खेळाच्या मैदानासोबतच देश रक्षणातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत... ते भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांड अंतर्गत आयएनएस तूणीर (INS Tunir) मध्ये कार्यरत आहेत... त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सहकारी जवान आणि अधिकाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे...
विजयानंतर बोलताना राकेश बेदी म्हणाले की, "हे पदक माझी कठोर तपश्चर्या आणि हितचिंतकांच्या आशीर्वादाचे फळ आहे..." त्यांनी आपल्या यशाचे श्रेय विशेषतः कमांडिंग ऑफिसर (INS तूणीर), ॲडमिन सेक्शन, वेस्टर्न नेव्हल कमांड, डीसीपी दिल्ली, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), दादी सती जाबदे कुस्ती आखाडा (खरक कलाँ), जे.एम. म्हात्रे ग्रुप, भारतीय वुशू असोसिएशन आणि त्यांच्या प्रशिक्षकांना दिले आहे...
राकेश यांच्या या यशाची बातमी मिळताच संपूर्ण शहरात आणि त्यांच्या मूळ गावी उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे... राकेश यांचा हा विजय युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल, असे क्रीडाप्रेमींचे म्हणणे आहे...

