मुंबई प्रतिनीधी: (सतिश पाटील): देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची प्रभाग आरक्षण आज सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे... सर्व प्रभागाची आरक्षणे ही नव्याने निघणार असल्याने सर्व पक्षाच्या माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांची धडधड वाढली आहे... सर्वच उमेदवारांनी आता आपल्याला पुरक आरक्षण पडावे, यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत...
मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांचे आरक्षण सोडत कार्यक्रम आज सकाळी ११ अकरा वाजता वांद्रे (पश्चिम) येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आले...वर्षभरापासून आगामी निवडणुकीची तयारी करण्यासाठी सर्वच पक्षातील इच्छुक आणि माजी नगरसेवकांचे लक्ष आजच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे... आरक्षणानंतर कुणाचा अपेक्षीत आरक्षण मिळणार, कोण नाराज होणार समजणार आहे... या सोडतीनंतर आरक्षणाचा फटका कुणाला बसणार? कुणाचा फायदा होणार, याची समीकरणे मांडली जात आहे...
मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी ही सोडत काढण्यात येणार आहे..
ही सोडत पूर्णपणे नव्याने निघणार असल्याने महापालिकेच्या माजी नगरसेवक तसेच विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार यांचे या पूर्वीचे अनुमान चुकले जाणार आहे... अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रभाग जवळपास निश्चित मानले जात असले तरी इतर मागासवर्ग आणि खुला प्रवर्ग महिला आणि पुरुष प्रभाग कुठले असतील याबाबत प्रत्येकाचे नशीब चिठीवरच ठरणार आहे...
आज होणाऱ्या लॉटरी सोडतीच्या चिंतेने अनेकांच्या पोटातच भीतीचा गोळा आला आहे... विद्यमान प्रभाग पुन्हा कायम राखला जाणार किंवा आपल्या जाती प्रवर्गानुसार आरक्षण पडणार याकडे संबधितांचे लक्ष आहे...
देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ही नेहमीच राज्यातील राजकीय केंद्रबिंदू राहिली आहे... त्यामुळे यावर्षीच्या प्रभाग आरक्षणावर सर्व पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले आहे... मुंबई महानगरपालिकेचे यूट्यूब (@MyBMCMyMumbai) या सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे...
महिलांसाठी राखीव
एकूण प्रभागांपैकी सुमारे ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय मागील निवडणुकीप्रमाणेच कायम ठेवला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत... या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर महिलांचा सहभाग आणखी वाढण्याची शक्यता आहे...
2017 मध्ये झालेल्या बीएमसी निवडणुकीत शिवसेनेने 84 जागा तर भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या.. या वेळेस दोन्ही पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा अपेक्षित आहे... विरोधी पक्षांनी आरक्षणाच्या स्वरूपावरून आक्षेप घेण्याचीही शक्यता आहे...
