कैलासराजे घरत खारपाडा पेण
"जिथे जनतेचा विकास, तिथे उभा विश्वास"
पेण नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून श्री. विश्वास(सर) कृष्णा पाटील यांनी नगरसेवक पदासाठी रामवाडी प्रभाग क्रमांक ९ मधून शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचाराचा नारळ श्री लक्ष्मी नारायण मंदिरात
वाढवून प्रचार रॅलीला सुरुवात केली... महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब, अलिबागचे दमदार आमदार महेंद्र दळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाण चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत. श्री. विश्वास(सर) कृष्णा पाटील सर हे पेशाने शिक्षक असून रामवाडी प्रभाग क्रमांक ९ त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे... मनमिळावू प्रेमळ स्वभाव आणि सेवाभावी वृत्ती असल्याने त्यांना मानणारा वर्ग रामवाडी विभागात आहे. त्यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यापासून तरुण वर्ग आणि रामवाडी नागरिकांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या चाहत्यांमध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे... लक्ष्मी नारायण मंदिरातून प्रचाराचा शुभारंभ करून रामवाडी हायवे ते रामवाडीत काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत "जिथे जनतेचा विकास, तिथे उभा विश्वास" ताई माई अक्का विचार करा पक्का, धनुष्य बाणावर मारा शिक्का.! शिवसेना जिंदाबाद.! अशा घोषणांनी संपूर्ण रामवाडी परिसर निनादून गेला होता. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. प्रचार रॅलीला पेण तालुक्यातील शिवसेना शिंदे गट तालुका पदाधिकारी, महिला आघाडी, स्थानिक युवा वर्ग, नागरिक व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला...
शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार श्री विश्वास पाटील सर म्हणाले की, प्रभाग क्रमांक ९ मधील जनतेची सेवा आणि विकासकामांना गती देणे हाच माझा प्रमुख ध्येय आहे आणि या विश्वासावरच मी निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उभा आहे... आपल्या सर्वांच्या विश्वासाने त्यांचा विजय नक्कीच होईल..!
