मुंबई प्रतिनीधी:(सतिश पाटील)
मुंबई : वोट चोरी आणि निवडणुकांच्या मतदार याद्यांमध्ये असणाऱ्या घोळा संदर्भात सर्व विरोधी पक्षांकडून एकत्र येत आज सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आला... मात्र, पोलिसांकडून या मोर्चासाठी परवानगी दिली गेली नसल्यामुळे त्यांना आझाद मैदानामध्ये प्रवेश नसल्याची माहिती सूत्रांनी दिली... त्यामुळे या मोर्चादरम्यान नेत्यांच्या संबोधनासाठी महानगर पालिकेसमोर रस्त्यावरच ट्रक लावून स्टेज उभारण्यात आलं असून साऊंड सिस्टिम वगैरे सर्वांची व्यवस्था रस्त्यावरच केली...
दुबार मतदार आढळल्यास मनसे स्टाईल उत्तर
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत... कल्याण ग्रामीण, मुरबाड, भिवंडी येथील मतदारांनी मलबारहिल मतदारसंघात मतदान केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे... सोबतच दुबार मतदार आढळल्यास मनसे स्टाईल उत्तर देण्याच्या सूचना देखील राज ठाकरेंनी दिल्या आहेत...
उद्धव ठाकरे मोर्चात बोलताना म्हणाले की, आम्हाला निवडणुका नकोत, असं मी कधीच म्हटलेलं नाही... आम्ही यांना लोकशाहीच्या मार्गानं ठोकायला आसुसलेले आहोतच... पण, दोषयुक्त मतदारयाद्यांच्या आधारे आणि मतचोरी करून तुम्ही निवडणुकीआधीच निकाल ठरवत असाल, तर जनतेनं ठरवायचं आहे की निवडणुका होऊ द्यायच्या की नाही... आजपासून प्रत्येक नागरीकानं ही जबाबदारी घेतली पाहिजे, मतचोर जिथं दिसेल, तिथं त्याला फटकवा, लोकशाही मार्गानं फटकवा... आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही, पण कायद्याचा खोटा दंडुका आमच्या माथी मारला जात असेल, तर त्या कायद्याचं काय करायचं, हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे...
मतदार यादीत कोणाची नावं टाकायची हे सगळं हेच ठरवत आहेत - उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेंनी एक अर्ज वाचून दाखवला... ज्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव होतं... हा अर्ज पडताळणीसाठी करण्यात आला होता... परंतु, आपण अशाप्रकारे कोणत्याही प्रकारचा ऑनलाइन अर्ज न करता, खोट्या मोबाईल नंबरच्या आधारे तो करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.. हा प्रकार कोण करतंय, याबाबत रितसर तक्रार केली आहे... याचा अर्थ माझ्या खोट्या मोबाईल नंबरने ओटीपी काढण्याचा प्रयत्न झालाय... हॅकींगचं हे प्रकरण आहे... २३ तारखेला हा अर्ज केला गेलाय, माझ्यासह माझ्या कुटुंबातील चारही जणांची नावं बाद करण्यासाठी हा अर्ज केला गेलाय... याचाच अर्थ यांचा सर्व्हर कोणाच्यातरी हातात दिलाय... कोणाची नावं टाकायची, कोणाची ठेवायची, हे सगळं हेच ठरवत आहेत...
महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिल्यांदाच यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं... ते म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर आज प्रथमच महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिल्यांदाच झाली असेल... यानिमित्तानं मतचोरी करणाऱ्यांना सांगतो, आज नुसती ठिणगी बघताय, तिचा वणवा कधी होईल हे सांगू शकत नाही... तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीत आहे... शोलेमध्ये एक डायलॉग आहे, सो जा बेटा, नहीं तो गब्बर आयेगा... त्याप्रमाणे आज तुम्हाला सांगतो, जागे रहा, नाहीतर ऍनाकोंडा येईल... या ऍनाकोंडाला आता कोंडावंच लागेल... मी आज मुख्यमंत्र्यांना तुमच्यासमोर आव्हान देतोय, तुम्ही आमचा काय तो पर्दाफाश कराचा तो करा... मुख्यमंत्री असं बोलताहेत, याचा अर्थ त्यांनी हे मान्य केलंय की मतचोरी झालेली आहे...
