रामटेक-तुमसर मार्गांवरील अपघात
सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्ष ऋषिदास तांडेकर गंभीर जखमी
प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेक :- रामटेक-तुमसर मार्गावर बोरी परिसरा दुपारी अडीचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्ष ऋषिदास उदल तांडेकर (वय ५८, रा. तुमसर) गंभीर जखमी झाले... अपघात इतका जबरदस्त होता की गाजराने भरलेला ट्रक रस्त्यावरच पलटी झाला, तर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती... ऋषिदास उदल तांडेकर हे आपल्या सीजी ०४ / केटी ४११ या कारने तुमसरहून रामटेककडे जात होते... त्याचवेळी एमपी ०९/ एके ४३४५ या ट्रक केदारसिंग रामरतन डोडे (वय ४०, रा. इंदोर) रामटेकहून तुमसरच्या दिशेने निघाले होते... दरम्यान, बोरी परिसरात आल्यानंतर कारचा अचानक टायर फुटल्याने तांडेकर यांची कार अनियंत्रित होऊन थेट समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडकली... अपघात टाळण्याच्या प्रयत्नात ट्रकचालकाने वाहन वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र ट्रक रस्त्यावर पलटी झाला... या भीषण अपघातात तांडेकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रियान हॉस्पिटल, रामटेक येथे उपचार सुरू आहेत... ट्रकचालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपजिल्हा रुग्णालय, रामटेक येथे दाखल करण्यात आले आहे...
घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली... ट्रॅफिक पोलीस हवालदार निलेश गावंडे आणि ओमकार तिरपुडे यांनी तत्परतेने काम करत वाहनचालकांना पर्यायी मार्गाने वाहतूक सुरळीत केली... काही वेळानंतर रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. अपघातामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होतेस्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या वेगवान कारवाईचे कौतुक केले. रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीत नोंद करण्यात आली असुन अपघाताचा पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत...
