महाराष्ट्र वेदभुमी

"१७ एकरमध्ये उभे असलेले ‘सेवन हिल्स’ खाजगीत गेले तर गरीब रुग्ण बाहेरच! – अंधेरीत मोर्चातून इशारा”


रायगड :- (नरेश पाटील) अंधेरी विकास समितीतर्फे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह गुरुवारी दि. 06 नोव्हेंबर, 2025 रोजी अंधेरी पूर्व येथील सेवन हिल्स हॉस्पिटलकडे सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात आला... कार्याध्यक्ष दिलीप माने आणि अध्यक्ष माजी मुंबई उपमहापौर काँग्रेस पक्षाचे राजेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्च्यात रुग्णालय खाजगी उद्योगपतीकडे विक्रीच्या हालचाली विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली...

    २०१० मध्ये महानगरपालिकेतर्फे स्थापन झालेले हे १५०० बेड, ३६ ऑपरेशन थिएटर, १२० आयसीयू आणि १७ एकर परिसर असलेले अत्याधुनिक रुग्णालय गरीब व मध्यम वर्गीयांसाठी मोठा आधार ठरलेले आहे... सध्याचा खाजगी संचालक दिवाळखोरीत गेल्याने विषय कोर्टात असून, नवीन खाजगी उद्योगपतीकडे विक्रीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळताच अंधेरीतील नागरिकांत संताप पसरला... रुग्णालय पंचतारांकित स्वरूपात रूपांतरित झाल्यास सामान्य रुग्णांना उपचार तर दूरच, प्रवेशही मिळणार नाही, अशी भीती समितीनं व्यक्त केली...

      मोर्चापूर्वी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पालकमंत्री आशिष शेलार, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, खासदार रवींद्र वायकर आणि आमदार मुर्जीकाका पटेल यांना देण्यात आले... मोर्चाच्या ठिकाणी आमदार मुर्जीकाका पटेल प्रत्यक्ष उपस्थित राहून मागण्यांना पाठिंबा जाहीर केला... पुढील २–३ दिवसांत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत समितीच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले...

     अध्यक्ष राजेश शर्मा यांनी रुग्णालय महानगरपालिकेकडे चालविण्यात कसलीही आर्थिक अडचण नाही असे सांगत, KEM, JJ आणि सायन हॉस्पिटलच्या धर्तीवर रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली... गरीब विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात मेडिकल व नर्सिंग शिक्षण मिळावे, तसेच सामान्य रुग्णांना विनाअडथळा उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालय महानगरपालिकेकडेच राहिले पाहिजे, असा स्पष्ट आग्रह मोर्चातून व्यक्त करण्यात आला...

    मोर्चात उपाध्यक्ष दिनकर तावडे, शांताराम पाटकर, अखिलेश सिंग, क्लाइव्ह डायस, प्रमोद सावंत, शिवनाथ खैरनार आदी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.... मोर्चाच्या समारोपावेळी शांताराम पाटकर यांनी हा लढा शेवटपर्यंत नेण्याचा निर्धार व्यक्त करत मोर्चाचा समारोप केला...

Post a Comment

Previous Post Next Post