प्रतिनिधी: सचिन चौरसिया
रामटेक :- भारताचे लौहपुरुष, स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, भारताच्या एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकजुटतेचा औचित्य साधून शुक्रवार (ता.३१) ला सकाळी ७ वाजता रामटेकातील पोलीस स्टेशन, आंबेडकर, गांधी, शात्री चौक ते रामटेक पोलीस स्टेशन कार्यालय या दरम्यान एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते... नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी रामटेक पोलीस स्टेशन येथे हिरवा झेंडा दाखवून “एक भारत, एक संकल्प, एक दिशा” अशी घोषणा देत एकता दौडचा शुभारंभ केला... दौडमध्ये पोलीस दल, संकल्प कॅरीअर अकॅडमी साटक, लक्षवेध अकॅडमी नगरधन, सृष्टी सौंदर्य परिवार ग्रुप, योगा ग्रुप आणि जेष्ठ नागरिक यांनी उत्साहाने सहभाग घेतला... या एकता दौडमध्ये रामटेकमधील नागरिक तसेच अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला... या एकता दौडचा समारोप रामटेक पोलीस स्टेशन कार्यालय आवार येथे करण्यात आला... रामटेकचे ठाणेदार अरविंद कुमार कथलाम यांच्या नेतृत्वात एकता दौड पार पडली... एकता दौडमधून समाजात देशभक्ती, एकता आणि सौहार्दाचा संदेश पोहोचविण्यात आला...
भारतीय एकतेचे शिल्पकार
सरदार वल्लभभाई पटेल (१८७५-१९५०) हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य नेते होते... त्यांनी ५६२ संस्थानांचे एकत्रीकरण करून "अखंड भारत" घडवला... त्यामुळे त्यांना “लौहपुरुष” आणि “भारतीय एकतेचे शिल्पकार” म्हणून ओळखले जाते... त्यांच्या सन्मानार्थ गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी हे जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला आहे...
