कमी वेळेत जास्त नफा देण्याच्या आमिषाने गुंतवणुकीचा सापळा
ॲप अचानक बंद; तरुणांसह महिला सायबर फसवणूकीचे बळी
प्रतिनिधी: सचिन चौरसिया
रामटेक :- आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत मोठ्या संख्येने गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घालणार्या जीटी अँप ऑनलाईनच्या माध्यमातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे... या ऑनलाईन अँपमूळे तालुक्यातील गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे... मागील चार महिन्यांपासून या ॲपद्वारे नागरिकांना कमी वेळेत जास्त पैसे मिळवा या आमिषाने गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले...
या ॲपमध्ये तरुण-तरुणी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आयडी तयार करून आपल्या मेहनतीची कमाई गुंतवली... मात्र, ४ नोव्हेंबर रोजी जीटी ॲप अचानक बंद झाल्याने नागरिकांना आपल्या फसवणुकीचा अंदाज आला...
प्राप्त माहितीनुसार रामटेक तालुक्यासह संपूर्ण देशात जीटी ॲपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे समजते... जीटी ॲपवर नागरिकांचे विश्वास संपादन करण्याकरिता सस्ते मार्फत अनेक सामाजिक कार्य करीत असल्याच्या खोट्या फोटो शेअर केल्या गेल्या तसेच विविध खोटे आश्वासन दिले गेले त्यामुळे अनेक नागरिकांचे यात हजारो-लाखो रुपये अडकले आहेत... सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना नागरिक अजूनही अशा ऑनलाईन आमिषांना बळी पडत असल्याचे स्पष्ट होत आ..हे. पोलिसांनी या संदर्भात सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडितांकडुन होत आहे...
सायबर फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी-
१) अनोळखी ॲप्स किंवा वेबसाइटवर पैसे गुंतवू नयेत...
२) कमी वेळेत जास्त नफा देणाऱ्या योजना बहुधा फसव्या असतात...
३) कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी त्या कंपनीची नोंदणी व परवाना तपासा...
४) संशयास्पद दुवे (links) किंवा मेसेजेसवर क्लिक करू नका...
५) सायबर फसवणूक झाल्यास त्वरित सायबर क्राईम हेल्पलाईन-१९३० किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा... किंवा नजीकच्या पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार नोंदवा...
