महाराष्ट्र वेदभुमी

अवकाळी पावसामुळे शेतकरी राजाचा अतोनात नुकसान.. हातातोंडाशी आलेला घास हिरावला..

प्रतिनिधी नंदेश गायकर.. बळीराजा म्हणजे उभ्या जगाचा पोशिंदा, याच बळीराजाच अशा अवकाळी पावसामुळे खूप मेहनतीने आणि कष्टाने पिकवलेल्या धान्याची नासाडी झाली आहे. हातातोंडाशी आलेला सोन्याचा घास नियतीने हिरावून घेतला असे जणू चित्र निर्माण झाले आहे... 

       अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचून कापणीला आलेले पिक पार भिजून गेल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. जगाव की मराव काही कळेनासे झाले आहे. शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा म्हटला जातो पण आज त्याने नियतीपुढे हात टेकले असे विदारक सत्य समोर दिसत आहे. सरकार मायबाप देणाऱ्या तुटपुंज्या मदतीवर आपले कसे भागणार? ही चिंता त्याला सतावत आहे...

       दिवस रात्र पायाने शेताची माती तुडवत कष्टाच्या भाकरीसाठी दोन दाणे पिकविणाऱ्या शेतकऱ्याच्या नशिबी हे दिवस येतील अशी अपेक्षा पण त्याने केली नसावी. यंदाची दिवाळीपण त्याच्या मुलाबाळांना सुखाची मिळाली नसेल असे भयाण वास्तव त्याच्या पदरी आले आहे...

       नोव्हेंबर अखेर शेतकऱ्याचा पिक कापणीला येतो पण या सतत धार पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचले असल्याने भिजलेला भात कापून मी करू काय अशी व्यथा त्याने मांडली आहे. निसर्गात बदल होतात पण इतके पण अतोनात नुकसान करणारा पावसाळा उभ्या आयुष्यात त्याने पाहिला नसेल...

        शेतीवर उदरनिर्वाह करणारा शेतकरी रडकुंडीला आला आहे शासनाने त्याच्या डोळ्यांतील अश्रू पाहून शक्यतो भरीव मदत करावी अशी मागणी प्रत्येक शेतकरी शासनाला करीत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post