महाराष्ट्र वेदभुमी

मुरूड जंजिरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत २ नगराध्यक्षा सह २६ नगरसेवक पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल !

प्रतिनिधी शहानवाज मुकादम/रोहा: मुरूड जंजिरा: नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकी २०२५ उमेदवारी करिता कालच राज्य निवडणूक आयोगाने रविवार ही उमेदवारी अर्ज भरण्यास मुभा दिल्याने शहरातील सर्व पक्षांनी या दिवसांचा फायदा घेत आज सकाळी जय भवानी जय शिवाजी घोषणा देत मुरूड जंजिरा नगरपरिषद कार्यालयातील सभागृहात शिवसेना पक्षांसह सह अपक्ष , मनसे , शेकाप पक्षांकडून आज नगराध्यक्षा सह २८ जणांनी  उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार-आदेश डफल यांच्या कडे सुपुर्त करण्यात आले...

आज सकाळी शिवसेना पक्षांकडून आज जय भवानी जय शिवाजी घोषणा देत नगरपरिषद कार्यालयात जवळील राजे शिवछत्रपती महाराजांना पुष्पहार अर्पण करून शिवसेना पक्षांकडून थेट नगराध्यक्षा पदाकरीता कल्पना संदिप पाटील व १५ नगरसेवक पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केले... व  शेकाप पक्षांकडून अंकिता मनिष माळी यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार-आदेश डफल यांच्याकडे सुपुर्त करण्यात आला...

शिवसेना पक्षांकडून नगरसेवका पदाकरिता प्रभाग क्रमांक ८ अ व  १० अ मधुन वैदेही प्रकाश आरेकर 

प्रभाग क्रमांक ३ ब मधुन विरेंद्र दत्तात्रेय भगत

प्रभाग क्रमांक ९ अ मधुन पांडुरंग कृष्णा आरेकर

प्रभाग क्रमांक ५ ब मधुन  अ.रहिम अ.हमीद कबले

प्रभाग क्रमांक ३ ब मधुन  मंदार रामकृष्ण दांडेकर 

प्रभाग क्रमांक ५ अ मधुन श्रेया शैलेश माळी

प्रभाग क्रमांक ३ अ मधुन शिवानी प्रकाश रणदिवे 

प्रभाग क्रमांक ६ अ मधुन नगमाना इम्तियाज खानजादे

प्रभाग क्रमांक ८ ब मधुन रुपेश शंकर पाटील  

प्रभाग क्रमांक ७ ब मधुन मनिष मोहन विरुकुड

प्रभाग क्रमांक ८ ब  मधुन ओम महेश पाटील 

प्रभाकर क्रमांक १० ब मधुन श्रीकांत नारायण खोत

प्रभाग क्रमांक ४ ब मधुन नितिन नामदेव आंबुर्ले

प्रभाग क्रमांक ७ अ मधुन अंकिता दिपेश गुरव 

शेकाप पक्षांकडून नगरसेवक पदासाठी 

प्रभाग क्रमांक ६ अ  व ४ ब मधुन रुमाना मुदस्सर मजगांवकर

प्रभाग क्रमांक २ अ मधुन संकेत रमेश अपराध 

प्रभाग क्रमांक ५ ब मधुन मनिष हरिश्चंद्र माळी 

 प्रभाग क्रमांक ७ ब मधुन अंकित प्रविण गुरव

प्रभाग क्रमांक १० ब मधुन  जागन जगन्नाथ पुलेकर

प्रभाग क्रमांक ६ ब मधुन मनिष सुधाकर शामा 

प्रभाग क्रमांक ६ अ मधुन युविका युवराज भगत

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांकडून प्रभाग क्रमांक ९ ब मधुन उषा चिंतामणी बोरजी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला...

प्रभाग क्रमांक ३ अ मधुन नरेंद्र नथु माने यांनी नगरसेवक पदा करिता अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे...

यावेळी संदिप पाटील, पांडुरंग आरेकर, उल्हास मकु, पुरुषोत्तम आरेकर आदिंसह शिवसेना , मनसे, शेकाप पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते...



Post a Comment

Previous Post Next Post