महाराष्ट्र वेदभुमी

सोगाव येथील ज्येष्ठ नागरिक इकबाल कुर यांचे निधन,

सोगाव-:अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील ज्येष्ठ नागरिक तथा मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर यांचे वडील इकबाल कुर (वय ७७) यांचे बुधवार दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. याबाबत सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे...

     इकबाल कुर यांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांचे दफनविधी त्याच दिवशी रात्री साडे आठ वाजता सोगाव येथील कब्रस्तानात मोठ्या शोकाकुल वातावरणात करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, पुतणे, पुतण्या, भावजय, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post