पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर): रायगड जिल्ह्यातील, रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा पुगांव येथे कार्यरत असणारे प्राथमिक शिक्षक श्री प्रसाद यशव़ंत साळवी यांना यावर्षीचा सन 2025 सालचा रायगड जिल्हा परिषदेचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत आरसीएफ हॉल अलिबाग येथे पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
त्यामुळे सरांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, सर्वांगीण कामाची पोहोचपावती त्यांना या पुरस्काराच्या निमित्ताने मिळालेली आहे.
महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार आदिती तटकरे, रा.जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले मॅडम, यांच्या शुभहस्ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सत्यजित बडे, रा.जि.प. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले मॅडम यांच्या व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रसाद साळवी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला...
प्रसाद साळवी सरांनी आपल्या या पुरस्काराचे श्रेय आई, वडील, पत्नी, बहिण, गुरुजन वर्ग, विद्यार्थी,पालक,जिल्हा व तालुका शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती, पुगांव केंद्र, समाज, शिक्षक मित्रपरिवार यांना दिलं आहे...
रोहा तालुक्याच्या गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी व अधिकारी वर्ग, सर्वच क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती रोहा रायगड, जिल्ह्यातील सर्व गुरुजन वर्ग, शाळा व्यवस्थापन समिती पुगाव, तसेच पुगांव मधील युवक, युवती महिला मंडळ, ग्रामस्थ, सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघ पुगांव, अभिनव मित्रमंडळ महागांव, केंद्र पुगांव यांच्याकडून तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे...
