महाराष्ट्र वेदभुमी

एक चूक अन् खेळ खल्लास! कार व ट्रॅव्हल्सची जोरदार धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

तीन वाहनांच्या विचित्र अपघातात कार मधील तीन ठार

देवलापार जवळील वडंबा शिवारातील घटना

प्रतिनिधी :  सचिन चौरसिया

रामटेक :- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला... वडंबा शिवारात बुधवारी (दि.२९) दुपारी दोन वाजताच्या सुमारास अपघात झाला... या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, तर ट्रॅव्हल्समधील एक जण गंभीर तर काही प्रवासी किरकोळ जखमी झालेले आहे... समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार विरुद्ध दिशेच्या गेल्यामुळे जबलपूरहुन नागपूर कडे येणाऱ्या ट्रॅव्हल्सवर थेट धडकली... या अपघातात कारमधील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतकांची नावे कपिल मोहनलाल साहनी वय ५० वर्ष राहणार घर नंबर २८ काटा शोरूमच्या मागे गोरखपूर रोड जबलपूर, चालक अमित अनिल अग्रवाल वय ५१ वर्ष राहणार तिलहेरी जबलपूर तर मागे बसलेले संदीप केदारनाथ सोनी वय ५१ वर्ष राहणार भेडाघाट रोड ग्रामपंचायत कुगबा जबलपूर अशी आहे... हे तीन मित्र असून कपील साहनी व अमीत अग्रवाल यांचा हॉटेलचा व्यायसाय आहे तर संदीप सोनी हे कंत्राटदार होते...

नागपुर जबलपूर महामार्गावर वडांबा येथे गावात जाण्याकरिता कट पॉईंट आहे... नागपूर कडून जबलपूरकडे कार क्र. एमपी २० झेडए ००१४ जात होती... सत्यम ट्रव्हल्सची बस क्र. एमपी २२ झेडजी ५८२२ जबलपूर कडून नागपूर कडे येत होती... तर ट्रक क्र. आरजे ११ जीसी ६६६३ हा बडांबा जवळ नागपूरच्या दिशेने जाण्याकरीता उभा होता... रूपचंद मारुती दिवटे वय ६२ व त्याची पत्नी शकुंतला रूपचंद डीवटे वय ५४ राहणार काळा फाटा ता पारसिवनी हे वडांबा येथील पेट्रोल पंपाकडून चुकीच्या दिशेने येवून त्यांना वडांबा येथे जायचे होते... समोरून कार पाहताच ते घाबरले व त्यांची गाडी पडली... हे पाहून त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात कारवरून नियंत्रण सुटल्याने ती कार कट पॉईट क्रास करून नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर आली... समोरून नागपूरकडे जाणारी भरधाव ट्रव्हल्सने त्या कारला आमनेसामने जोरदार धडक देत फरपटत नेले व ही दोन्ही वाहने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळल्या. या अपघातात कारचा चेंदामेंदा होऊन कारमधील तीनही मित्रांचा जागीच मृत्यू झाला... तर ट्रॅव्हल्सचा चालक, वाहक व क्लीनरसह १० प्रवासी जखमी झाले... घटनेची माहिती मिळताच देवलापारचे ठाणेदार नारायण तुरकुंडे ताफ्यासह घटनास्थळ गाठले... अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली... अपघातातील सर्व जखमी व्यक्तींना प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे दाखल करण्यात आले तर गंभीर जखमीला नागपूर येथे रवाना केले... पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले...

ट्रॅव्हल्समधील जखमी प्रवासी

चालक राजू कंचनलाल चौरसिया (वय ३५) रा. केवलारी, ग्राम खैरी, जि. शिवनी), ट्रॅव्हल्स हेल्पर संजय जुमनलाल मरसकोल्हे (वय २१) रा. घोगरी, जिल्हा शिवनी), बस वाहक संजय रवी यादव (वय ३२) रा. दुर्गाचौक लखना), संदीप टिकाराम करेंगे (वय ३२) रा. छपरा, शिवनी), तालन सुजन सिंग (वय ७४) रा. बिछवा जिल्हा छिंदवाडा), सुनील अकलचंद कावरे (वय ३२) रा. खुर्चीपार, जिल्हा शिवनी), शिवानी सोनू पंचेश्वर (वय २४, नागपूर), अब्दुल रफिक अब्दुल लतीफ (वय ४५) रा. झारखंड, धनंजय हिरामण चंदनबटवे (वय ४५, रा. कटंगी, सितारा परवीन अजीम मंसुरी (वय ५५) रा. सुंवरगड, ओडिशा...

Post a Comment

Previous Post Next Post