कोलाड (श्याम लोखंडे) : रायगड रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आराध्यग्रामदैवत धाक्सुद महाराज यांचा नवरात्रोत्सव हा रोहाचे आराध्यदैवत धावीर महाराज यांच्या प्रमाणेच साजरा केला जातो नवरात्रीचे नव दिवस येथील ग्रामस्थ व धाक्सुद क्रीडा मंडळाचे युवक विविध कार्यक्रम व उपक्रम करत दसराउत्सव साजरा करतात तर अकराव्या दिवशी श्री धावीर महाराज यांच्या पालखी सोहळ्याबरोबरच येथील या देवाचा पालखी सोहळा येथील ग्रामस्थ महिला युवक व युवती एकत्रितपणे साजरा करतात तर पालखीवर फुलांची उधळण करत तसेच फटाक्यांची आतषबाजी, फुगडी, नाच गाणे, धार्मिक तथा आध्यत्मिक सतं महातम्यांच्या अभंगाने नामघोष करत हा सोहळा गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला...
या उत्सवानिमित्त मंदिर व संपूर्ण गाव परिसर विविध रंगी फुलांच्या सजावटीने तसेच रोषणाईने सडा रांगोळ्यांनी सजविण्यात आले होते,प्रत्येकाने आपल्या अंगणात वर्षातून एकदा धाक्सुद महाराज,भैरव,चिल्लाई माता,जोगेश्वरी, हनुमंत राय मंदिर गाभाऱ्यातील या प्रमुख देवांची पालखी येणार असल्याने सुंदर रांगोळयांनी वातावरण प्रसन्न झाले होते. दुपारी तीन वाजता मंगलमय वातावरणात तसेच गोंधळ्यांच्या पारंपरिक वाद्याने ग्रामदैवताची महाआरती करत धाक्सुद महाराजांचा जयघोष करत पालखी पारंपारिक टाळ मृदुंग व वाद्यांच्या गजरात संत महात्म्यांच्या अभंग वाणीचे भजन करत मंदिरातून गावात मार्गस्त झाली...
संपूर्ण गाव आनंददायी वातावरणात आराध्य ग्राम दैवत घरी येणार या भावनेने येथील ग्रामस्थांच्या अंगणात ठिकाणी कुटूंब ग्रामस्तांना पालखीचे दर्शन देत रात्रौ नऊ वाजता मंदीरात परतली. यावेळी पून्हा महाराजांना व पालखीच्या स्वागतासाठी गावातील सर्व ग्रामस्थ महिला, युवक मंडळी यांनी विशेष करून रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या मंदिर परिसर रोषनाई तसेच दिव्यांच्या तसेच फुलांनी सजवली तसेच प्रेवश दरात भली मोठी रांगोळी ही सर्वांना आकर्षक ठरत या सोहळयाला एक वेगळे रूप प्राप्त करून देत होते ,तर काही ठिकाणी पालखीच्या सोबत असलरले भाविक महिला मंडळ भजन मंडळसाठी ठिकठिकाणी विविध मंडळांमार्फत व भाविकांनी थंड पेये चहा अल्पपोहाराची व्यवस्था यावेळी केली होती...
उत्साही वातावरण लाभलेल्या या नवरात्रोत्सव व विजया दशमी व दसराउत्सव सोहळ्यात आळंदीहून खास ह भ प नारायण महाराज नागोरगोजे यांची दसऱ्यानिमित्ताने कीर्तन रुपी सेवा करत पालखी सोहळ्याला शुभेच्छा दर्शवतात तर तसेच ग्राम पंचायतीचे सरपंच रविंद्र मरवडे, त्याच बरोबर उपसपंच तसेच सदस्य यांनी यांनी देखील सदिच्छा भेट देत दर्शन घेतले.तसेच लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१ ए ४ सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी यांनी देखील पालखीचे दर्शन घेत सामाजिक उपक्रमाचा संदेश दिला... कोलाड विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलिस शिद आणि अंमलदार पाटील, यांनी सदिच्छा भेट देत दर्शन घेत ग्रामस्थांना या उत्सवाप्रसंगी शुभेच्छा देत कायदा सुव्यवस्थेचा पालन करत उत्सव आनंदाने साजरा करावा असे सांगितले.तसेच पंचक्रोशीतुन देखील भक्त भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होत आनंद लुटतात येथील युवक मंडळांनी या नवरात्रोत्सवात खास युवकांसाठी व महिलांसाठी विशेष कार्यक्रम राबवत सर्वांना मंडळाच्या वतीने महाप्रसाद भोजनाचा लाभ देत सांगता समारोह करण्यात आले.मात्र सकाळपासून काळभोर आभार आणि पावसाचे सावट नजरेत दिसून येत होते पण वरुण राजाने देखील कृपा केली आणि या पालखीला सतत बसणारा वरून राजा याने विश्रांती दिल्याने येथील ग्रामस्थानी तसेच भक्तगणांनी अधिक भक्ती रसात तल्लीन होऊन या कार्यक्रमाचा आनंद लुटला...