(छत्रपती संभाजीनगर)
सरसकट कर्ज माफी मिळावी.
मुंबई प्रतीनीधी :(सतिश पाटील): राज्यात अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी चा निर्णय राज्य शासनाने त्वरित घ्यावा या मागणीसाठी शिवसेना उबाठाच्या वतीने दि.८ ऑक्टोंबर रोजी कळमनुरी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले...
राज्यात अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे हातचे आलेले पिके गेली शेतकरी हवालदिल झाला असुन शासनाने निवडणुकीत सरसकट कर्ज माफीची घोषणा केली होती पण अद्याप ही निर्णय घेतला नाही आज घडीला शेतकरी वर्ग नैसर्गिक आपत्ती मुळे अडचणीत सापडला यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी पीक विम्याचे अटी शिथिल करीत पंचनाम्याची प्रक्रिया बाजूला करीत पीकविमा रक्कम द्यावी, घरे, पशुधन नुकसानी ची भरपाई द्यावी तसेच ५० हजार हेक्टरी मदत द्यावी...
या मागणीसाठी आज उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शिवसेना उबाठा गटाच्या वतीने खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार जिवककुमार कांबळे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख अजय सावंत उर्फ गोपू पाटील, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, अब्दुल्ला पठाण,तालुका प्रमुख सखाराम उबाळे, ,युवा सेना जिल्हाप्रमुख शिवा शिंदे, नंदकिशोर तोष्णीवाल, बंडू पाटील,संतोष सारडा,बाळू पारवे, आदिसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते...