महाराष्ट्र वेदभुमी

तर निवडणूकीसाठी उमेदवारांची नावे आहेत चर्चेत

रामटेक नगरपालिकेचे आरक्षण जाहीर

अध्यक्षपद नागरिकांचा मागासप्रवर्गसाठी राखीव

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक: रामटेक नगरपालिकेची आरक्षणाची सोडत जाहीर झाली असून, अध्यक्षपद नागरिकांचा मागासप्रवर्गसाठी आरक्षित करण्यात आले. काही उमेदवारांना मात्र झटखा बसला आहे तर दुसरीकडे अनेक इच्छुक उमेदवारांनी दावेदारी ठोकायला सुरुवात केली आहे. बुधवार (दि.८) ऑक्टोंबरला प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले... नगर परिषद निवडणूक २०२५-२०३० साठी रामटेक शहरात एकुन १० प्रभाग असुन प्रत्येक प्रभागात दोन वार्ड म्हणजेच दोन उमेदवार राहणार असल्याची माहिती आज नगर परिषद रामटेक येथे पार पडलेल्या आरक्षण सोडत कार्यक्रमादरम्यान पिठासिन अधिकारी तथा एसडीओ (महसुल) प्रियेश महाजन व नगर परिषद मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी माहिती देतांना सांगितले. सोडतीच्या वेळी नगरपरिषदेच्या एका शाळेतील चार विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यासाठी बोलविण्यात आले होते त्यांच्या हाताने चिट्ट्या काढून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. रामटेक नगरपरिषदेमध्ये शिवसेना भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. प्रत्येक पक्षांमध्ये कोण उमेदवार राहणार, कुठल्या उमेदवाराला पक्ष मैदानात उतरवणार याबाबत चर्चाला उधान आलेले आहे. नगरपरिषदेत पूर्वी भाजपची एक हाती सत्ता होती. भाजपचे दिलीप देशमुख नगराध्यक्ष होते. एकूण १७ नगरसेवकांपैकी भाजपकडे १३ शिवसेनेकडे, २ काँग्रेसकडे २ अशी स्थिती होती...

प्रभागनिहाय आरक्षण

१.(अ) अनुसूचित जाती सर्वसाधारण,(ब) सर्वसाधारण महिला, 

२.(अ) नामागाप्र, (ब) सर्वसाधारण महिला,

३.(अ) नामाप्र महिला, (ब) सर्वसाधारण, 

४.(अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण, 

५.(अ) नामाप्र महिला, (ब) सर्वसाधारण, 

६.(अ) नामाप्र महिला, (ब) सर्वसाधारण, 

७.(अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण, 

८.(अ) अनुसूचित जमाती, (ब) सर्वसाधारण,

९.(अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण, 

१०.(अ) नामाप्र, (ब) सर्वसाधारण महिला.

या उमेदवारांची नावे आहे चर्चेत

कांग्रेस मध्ये नगराध्यक्ष पदासाठी विशेष रस्सीखेच दिसत नाही. माजी नगरसेवक दामोदर धोपटे हे प्रबल दावेदार मानले जाते. पण कांग्रेस मध्ये काही सांगता येत नाही. वेळेवर दुसऱ्या पक्षातील एखाद्याला कांग्रेस मध्ये आणुन उमेदवार दिला जावु शकतो. शिवसेनत(शिंदेगट) सध्या बिकेंद्र महाजन, राजेश किंमतकर, ऋषीकेश किंमतकर, धर्मेश भागलकर, गजु बिसने, विवेक तुरक, यांची नावे चर्चेत आहे तर भाजपा कडून प्रबळ दावेदार म्हणून आलोक मानकर, ज्योती कोल्हेपरा, दिलीप देशमुख, मन्साराम अहिरकर यांची नावे चर्चेत आहेत.

पैशाला की समाजसेवेला प्राधान्य

मात्र, ही निवडणूक जनसंपर्का इतकीच उमेदवाराच्या आर्थिक ताकदीवरतीही अवलंबून आहे. ज्यांच्याकडे अधिक पैसा त्याच उमेदवाराची जिंकण्याची शक्यता अधिक, अशी चर्चा रंगत आहे. प्रत्यक्षात मूलभूत सुविधांची कमकरता आहे. नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची गर्दी होणार आहे. या निवडणुकीत विकासापेक्षा गांधीवाल्या हिरव्यानोटाच्या (पैशाच्या) राजकारणाला प्राधान्य मिळण्याची शक्यता असल्याचे राजकीय आपले मत व्यक्त करीत आहेत. नोटाची (पैशाची) देवाण-घेवाण, राजकीय समीकरणे आणितापलेले वातावरण पाहता नगरपालिकेची निवडणूक रामटेक शहराच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post