महाराष्ट्र वेदभुमी

मा.आमदार अनिकेत तटकरेंची वचनपुर्तता, आळंदीत कै.द.ग.तटकरे वारकरी भवनचे खा. सुनील तटकरेंच्या शुभहस्ते शुभारंभ.

कोलाड (श्याम लोखंडे) श्री तीर्थ क्षेत्र आळंदी अलंकापुरीत कोकणचे मा.आ.अनिकेत तटकरे यांची वचन पूर्तता बऱ्याच वर्षापासूनचे कोकणच्या पायी दिंडी वारकऱ्यांचे स्वप्न अखेर एक वर्षात केले साकार. कोकण दिंडी रोहा वारकरी संप्रदाय यांच्या वतीने आळंदी येथे बांधण्यात आलेल्या कै.द.ग. तटकरे वारकरी भवन संस्थापक असलेल्या ब्रह्मलीन पुरूषोत्तम महाराज पाटील (बापू) या वारकरी भवनाचा भव्य उद्घाटन सोहळा श्री तीर्थ क्षेत्र आळंदी येथे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला... कोकण विकासाचे शिलेदार रायगड रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार तथा भारत पेट्रोलियम व गॅस नियामक मंडळाचे चेअरमन  सुनील तटकरे व माजी आमदार दिलीप मोहिते पाटील,सुनील टिंगरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात करण्यात आले...

राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे राज्यसभा प्रफुल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून खासदार खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून तसेच मंत्री अदिती तटकरे मा.आ.तथा युवा नेते अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून आणि ब्रह्मलीन सद्गुरू पुरुषात्तोम महाराज पाटील यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या कै.द.ग.तटकरे वारकरी भवन उभारण्यात आले असून गेली अनेक दशके वर्षानूवर्ष रोहा तालुक्यातील पायी दिंडी वारीतून असंख्ये संप्रदाय भाविक माऊलीच्या समाधी संजीवनी सुखमय सोहळा डोळे भरून पाहण्यासाठी तसेच समाधी दर्शनासाठी आळंदीत दाखल होतात मात्र त्यांना सुसज्ज निवारा आणि त्यांची वारी प्रीत्यर्थ राहण्यासाठी भक्तनिवास भवन उभारण्यात यावा यासाठी रोहा कोकण वारकरी दिडी यांचे पदाधिकारी यांनी कोकणचे भाग्यविधाते रायगडचे कर्तव्यदक्ष खासदार सुनील तटकरे, युवा नेते अनिकेत तटकरे यांच्याकडे आग्रही मागणी केली होती...अखेर युवा नेते अनिकेत तटकरे यांच्या अथक प्रयत्नांनी एक वर्षाच्या आधी कोकणचे लोकसभेचे खा. सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून व राज्यसभा सदस्य खा. प्रफुल्ल पटेल यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत १५ लाख रू. प्राप्त झालेल्या निधीतून या भव्यदिव्य वारकरी भवनाचे लोकार्पण पार पडले... त्यामुळे येत्या कार्तिकी एकादशी वारीतील बहुसंख्ये पायी दिंडी वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या या सुसज्ज अशा मठात विसावा मिळणार आहे...

यावेळी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे विश्वस्त योगी निरंजननाथ गुरू शांतीनाथ,कोकण दिंडी अध्यक्ष विजय मोरे, सचिव मधुकर पाटील, खजिनदार विनोदभाऊ पाशिलकर, डी डी भोसले,रा. जि. राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस सुरेश मगर, प्रदीप धुमाळ, कैलास सांडभोर, सौरभ गव्हाणे, शिवराम शिंदे,शंकर भगत, प्रकाशेठ कुऱ्हाडे,रामचंद्र सकपाल, अप्पा देशमुख, अनिल भगत, हेमंत कांबळे, महेश बामुगडे, दत्ता चव्हाण, अनंत देशमुख, नरेश पाटील, नरेश बामुगडे, रामचंद्र नाकती, अमित मोहिते, रोहिदास पाशिलकर, सुशील शिंदे, प्रितम पाटील, नामदेव म्हसकर, किरण धनवी, प्रीतम पाटील,गुरुमाऊली प्रभावती पाटील, विठोबा मांडलुस्कर, नित्यानंद महाराज मांडवकर, दिनेश महाराज कडक सुशील शिंदे, रविंद्र मरवडे, आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच आदी रोहा तालुक्यातील पायी दिंडीतून सहभागी होणारे पूजनीय ब्रम्हलिन सद्गुरू पुरुषात्तोम महाराज पाटील यांचे असंख्ये अनुयायी संप्रदाय भाविक उपस्थित होते...

कै.द.ग. तटकरे वारकरी भवन संस्थापक असलेल्या ब्रह्मलीन पुरुषोत्तम महाराज पाटील (बापू) या वारकरी भवनामुळे तालुक्यातील समस्त वारकरी मंडळीची गैरसोय दूर होणार असून बऱ्याच वर्षांची प्रतिक्षा फळास आली असल्याची भावना वारकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत होती... तर हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी रूपेश मनोहर बामुगडे यांनी युवा नेते अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न केले असल्याचे सांगण्यात आले आहे... या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन ह.भ.प. महादेव सानप यांनी केले आहे... तसेच या भव्यदिव्य सोहळ्या प्रीत्यर्थ रोहा दिंडीच्या वतीने लोकप्रिय खा. सुनील तटकरे आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले...

श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच्या आळंदी अलंकापुरीत उभारण्यात आलेले हे वारकरी भवन केवळ चिंतन-भजनाचे स्थळ नसून, वारकरी परंपरेतील श्रद्धा, संस्कार आणि सेवाभावाचा प्रसार करणारे प्रेरणास्थान ठरेल. या भवनाला माझ्या वडिलांचे नाव देण्यात आले, हे माझ्यासाठी तसेच तटकरे परिवारासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे... या उपक्रमाबद्दल मी वारकरी संप्रदाय मंडळाचे मनःपूर्वक ऋणी असल्याचे खा. तटकरे यांनी म्हटले...

प्रसंगी यावेळी खा.तटकरे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात जाऊन माऊलींचे दर्शन घेतले... मंदिर समितीच्या वतीने प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ व विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे यांनी त्यांचे स्वागत केले... खा. तटकरेंनी वारकरी परंपरेच्या संवर्धनाचा संकल्प यावेळी जाहीर केला आहे...

या वारकरी भवनाच्या माध्यमातून भक्तांना माऊलींच्या सानिध्यात भक्तीरसाचा अनुभव घेण्यास एक सुंदर परिसर उपलब्ध झाला आहे... तर या भव्यदिव्य उ‌द्घाटन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कोकण दिंडी वारकरी संप्रदायाचे सर्व पदाधिकारी व वारकरी सदस्य तसेच माता भगिनी यांनी मोलाचे सहकार्य करत अथक परिश्रम घेतले...

Post a Comment

Previous Post Next Post