रोहा:चणेराविभागातील आनेक वर्षापासून गावागावात आणि वाड्यातील विकास कामांवर दुर्लक्ष होत आसल्याने उद्देश वाडकर यांच्या नेतृत्वात असंख्य नागरिकांची शिवसेना शिंदेगटात जाहीर प्रवेश करण्याची सुरुवात झाल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकी पुर्वीच राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शेतकरी कामगार पक्षा च्या बालेकिल्ल्याला हादरा... शिवसेना शिंदेगटाची आक्रमक रणनिती, मा.आमदार यांनी चणेराविभागात शिवसेनावाढीची प्रमुख नेत्यांवर सोपवली जबाबदारी...
शिवसेना (शिंदेगट) उपतालुका प्रमुख रोहा व पंचायत समितीचे माजी सभापति श्री उद्देश वाडकर यांचे हिंदू-मुस्लिम व सर्व समाजातील संबंध आणि सामान्य नागरिकांबरोबर आपुलकीचे नाते, तसेच मा. आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्याकडून चणेराविभाग होत आसलेल्या विकास कामांना बघता, चणेराविभागातील आनेक गावागावातील नादुरुस्त रस्ते, जलजीवन मिशन योजनेचे अपुर्ण कामे, मंदिरे, अस्वच्छता,बेरोजगारी, विद्युत पुरवठा(ट्रान्सफॉर्मर)आसे आनेक समस्या आहेत,
काल अलिबागचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या निवासस्थानी श्री उद्देश वाडकर यांच्यावर प्रेम करणारे खांबेरे आणि बोबडघर येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे...
चणेराविभागातील आनेक गाव आणि वाड्यातील आपल्या गाव विकासासाठी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख श्री उद्देश वाडकर आणि चणेरा विभाग प्रमुख श्री गैनिनाथ कटोरे यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदेगटात प्रवेश करण्याच्या तयारीत आसल्याचे दिसुन येत आहे,
या प्रवेश सोहळ्यात शिवसेना शिंदेगटाचे संपर्कप्रमुख सौ,संजीवनी ताई नाईक, उद्देश वाडकर(उपतालुका प्रमुख),मोतीराम गीजे, (जेष्ठ शिवसैनिक)गैनिनाथ कटोरे(चणेरा विभाग प्रमुख) सीएम ठाकुर( जेष्ठ शिवसैनिक) अँड अविनाश भगत (युवासेना तालुका प्रमुख) अँड मयुरा मोरे आदी पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होते...
