मयुर पालवणकर मुरुड:आशिया कप फायनलच्या आधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी ICC ने दोषी ठरवत कारवाई केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या 14 सप्टेंबरच्या सामन्यानंतर सूर्यकुमारने केलेल्या विधानावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. सुनावणीनंतर ICC ने त्याच्या सामन्याच्या मानधनातील 30 टक्के दंड वजा केला आहे. फायनलपूर्वी या निर्णयामुळे संघाच्या तयारीवर सावट आले आहे.
