कांतीलाल पाटील : नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई-: दि.१५ : कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष,माजी विधान परिषद सदस्य आमदार रमेश दादा पाटील त्यांचं नाव आणि काम गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत गाजतय.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या नेतृव्वावर विश्वास ठेवून ते अधिक जोमाने कार्य करत आहेत.आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी आणि समाजाचे जे प्रश्न आहेत .ते सरकारच्या दरबारापर्यंत पोहोचवण्यासाठी समाजसेवेचा ध्यास त्यांनी घेतला आहे.
आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी कोळी महासंघाची स्थापना केली.खूप कमी वेळामध्ये त्यांनी आपले कार्य अधिक जोमाने करून कोळी समाजाचे अधिक मजबूत नेतृत्व बनले.आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी कोणत्याही पक्षाची परवा केलेली नाही. त्यांनी कोळी समाजाच्या विविध प्रश्नावर आंदोलन करून मजबूत कार्य दमदार करून दाखवले.आपल्या तीव्र आंदोलनातून त्यांनी सरकारला जागा करण्याचं काम केलं.एक वेळानाही अनेक वेळा सरकारला आपल्यासमोर गुडघे टेकन्यास भाग पाडले.
एक सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या प्रभावी व्यक्तिमत्व असलेले रमेश दादा पाटील आपल्या समाजाच्या प्रश्नासाठी सदैव अहोरात्र झटत असतात.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी रमेश दादा पाटील यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आणि मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त केले.
रमेश दादा पाटील यांचे एकच लक्ष राहिलेला आहे. पद नाही आपल्या समाजाचा विकास झाला पाहिजे.
त्यांनी समाजाचे प्रश्नासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करून समाजाच्या व्यथा ऐकून, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केले आणि समाजाला न्याय मिळून दिला.महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला आर्थिक मदत,रुग्णालयामध्ये मदत अशी भरीव कामगिरी त्यांनी आज तागायत केलेले आहे व करत आलेले आहेत.
कलाकारांना चांगला व्यासपीठ मिळून देण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले आहेत.म्हणून महाराष्ट्रातील जनतेने त्यांना लोकनेते ही पदवी पार केलेली आहे.जनतेच्या मनातल्या व्यथा जाणणारा आणि त्या व्यथा सरकार दरबारी पोहचवून सोडूऊन देणारा हा देव माणूस आहे...
अश्या या देवरूपी लोकनेते माजी आमदार रमेश दादा पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
