महाराष्ट्र वेदभुमी

रोहेकरांच्या पाठपुराव्याला अखेर यश,

 


लोकप्रिय रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे यांच्या पर्यंतांना यश...

शहानवाज मुकादम/रोहा

 रोहा: रायगड जिल्ह्याचे मा. खासदार सुनीलजी तटकरे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री मा. ना. श्री. अश्विनी वैष्णवजी यांची सदिच्छा भेट घेऊन रोहा आणि पेण (रायगड) या रेल्वे स्थानकांवर काही रेल्वे गाड्यांना थांबा मिळणे बाबत  निवेदन दिले...

मा. खासदार तटकरे साहेबांच्या या पाठपुराव्याला यश आले असून पेण येथे 

1. DIVA - SWV EXP.

2. SWV – DIVA EXP.  

ह्या दोन गाड्या तर, रोहा येथे

1. DR – SWV TUTARI EXP.

2. SWV – DR TUTARI EXP. 

ह्या दोन रेल्वे गाड्यांचा अधिकृत थांबा मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून यामुळे प्रवास करणा-या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

 याबद्दल रेल्वे मंत्री मा. वैष्णवजी आणि लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचे मनःपूर्वक आभार जनतेकडून व्यक्त करण्यात येत आसल्याची माहिती समीर भाई जनार्दन शेडगे यांनी दिली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post