महाराष्ट्र वेदभुमी

गडहिंग्लज मध्ये मराठा आरक्षण विजय आंदोलनाचा जल्लोष

 

गडहिंग्लज/मुंबई :- (नरेश पाटील) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे पाच दिवसांपासून उपोषणाला बसले होते... त्यांच्या या लढ्याला अभूतपूर्व यश मिळाल्यामुळे महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथेही आरक्षण विजय आंदोलनाचा जल्लोष साजरा करण्यात आला... मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना महाराष्ट्र सरकारने मान्यता दिल्यानंतर गडहिंग्लज सकल मराठा समाजाच्यावतीने आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बुधवार दि. ०३ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी ११:३० च्या समई आनंदोत्सव साजरा करण्यात आला... शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले... “एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, जरांगे साहेबांचा विजय असो” अशा विविध घोषणा देत मिठाईचे वाटप करण्यात आले तसेच फटाक्यांची आतीषबाजी करून आनंदोत्सव साजरा झाला...  दरम्यानाचा काळात वाहनधारक व पदचाऱ्यांनाही लाडू देत आनंदोत्सवात सहभागी करून घेतले... विज्योत्सवातील कार्यकर्त्यांनी पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले व परिसर उत्साहाने दुमदुमून गेला...  यावेळी प्रामुख्याने किरण कदम (अध्यक्ष, सकल मराठा समाज), नागेश चौगुले (जिल्हाध्यक्ष, मनसे), आप्पासो शिवणे, युवराज बरगे, तानाजी कुराडे, शिवाजी कुराडे, एल. डी. पोवार साहेब, सरदेसाई सर, जगदीश पाटील, उत्तम देसाई, नाथा रेगडे, प्रा. शिवाजीराव भुकेले, अमरसिंह चव्हाण व ॲड. दिग्विजय कुराडे यांचा उपस्थिती होती... ही जल्लोषमय सभा मराठा समाजाच्या एकतेचे आणि आरक्षण हक्कांसाठीच्या सातत्यपूर्ण संघर्षाचे प्रतीक ठरली...

Post a Comment

Previous Post Next Post