महाराष्ट्र वेदभुमी

पोलिस असल्याचे सांगून ७० हजारांचे दागिने लंपास

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- पोलिस असल्याची बतावणी करुन दोन तोतयांनी अर्ध्या तासात एका वृद्धा जवळील सोन्याचे १५ ग्रॅमचे दागिने लुटले... या दागिन्यांची किंमत किमान सत्तर हजार रुपये आहे... ही घटना रविवार (दि.२८) सप्टेंबरला सकाळी दहा ते साडेदहा वाजताच्या सुमारास घडली... याप्रकरणी रामटेक पोलिस ठाण्यात दोघा अनोळखी इसमांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे... फिर्यादी सुरेश लालचंद दुबे  (७२, रा. रामटेक) हे सकाळी १०.०० ते १०.३० वाजताच्या दरम्यान स्कुटीने अंबाळा तलावाकडे पूजापाठ करण्याकरिता जात असतांना, दोन अनोळखी इसमांनी त्यांना थांबवले.... आपण पोलिस असल्याची बतावणी केली. " या रस्त्यावर लूटमार होते, त्यातील एका इसमाने दुबे यांना रामटेक शहरातील वातावरण बिघडले आहे, तुमच्याकडील सोने-चांदी कागदात काढूनठेवा व आमच्याकडे द्या, असे सांगितले... त्यावर त्यांनी गळयातील चेन १० ग्रॅम, हातातील अंगठी ५ ग्रॅम असा एकूण रुपये, ७० हजाराचा मुद्देमाल काढून संशयित चोरटयाच्या हातावर असलेल्या कागदात ठेवला... त्यानंतर आपल्या साथीदाराच्या गळयावर हात ठेवत दोन्ही इसमांनी चैन व अंगठी कागदात बांधल्याचा बनाव करून ती कागदाची पुडी त्याच्याकडे दिली... तोपर्यंत तोतया  पोलीस (आरोपी ) दुचाकीवरुन पोबारा केला. थोड्या वेळाने दुबे यांनी ती पुडी उघडून पाहिली असता त्यात काळा दगड आढळाला... सोन्याचे दागिने नसल्याचे निदर्शनास आले... आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाणे गाठले व तक्रार दिली... याप्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात दोघा अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे...

Post a Comment

Previous Post Next Post