श्रीगाव(वार्ताहर): अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथे नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून मरीदेवी मंदिरात दि. 28 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी श्रीगावमधील व परीसरातील रक्तदात्यानी रक्तदान करून रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्रीगाव येथील श्री मरीदेवी ग्रामस्थ मंडळाच्या वतिने व रायगड जिल्हा शासकीय रक्त केंद्र अलिबाग यांच्या सौजन्याने आयोजिलेल्या रक्तदान शिबिरात 50 हून अधिक रक्तदात्यानी रक्तदान केले. यासाठी रायगड जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या रक्तपेढीचे जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दिपक गोसावी आणि इतर सहकाऱ्यानी रक्त संकलन करण्यात मोलाचे योगदान दिले रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याना जिल्हा रक्तपेढीतर्फे प्रमाणपत्र व मरीदेवी ग्रामस्थ मंडळातर्फे वृक्ष भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. हा रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी श्रीगावमधील युवकांनी व मरीदेवी ग्रामस्थ मंडळाने विशेष परीश्रम घेतले...